- News
- सिटी क्राईम
- हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकरसोबत रशिया, इंडोनेशियात मौजमजा!, परतूरमध्ये दीड गुंठे प्लॉटची खरेदी...
हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकरसोबत रशिया, इंडोनेशियात मौजमजा!, परतूरमध्ये दीड गुंठे प्लॉटची खरेदी, शेअर मार्केटमध्येही एक कोटी गुंतवणूक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे २१ कोटी ५९ लाख रुपये हडपणाऱ्या हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २१, मूळ रा. अंबड, जि. जालना ह. मु. बीड बायपास) याची आई मनीषा, वडील अनिल क्षीरसागर आणि मामा हितेश शार्दूल या तिघांना रविवारी (५ जानेवारी) न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हर्षकुमारने आनंदवाडी, परतूर (जि. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे २१ कोटी ५९ लाख रुपये हडपणाऱ्या हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २१, मूळ रा. अंबड, जि. जालना ह. मु. बीड बायपास) याची आई मनीषा, वडील अनिल क्षीरसागर आणि मामा हितेश शार्दूल या तिघांना रविवारी (५ जानेवारी) न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हर्षकुमारने आनंदवाडी, परतूर (जि. जालना) येथे सीतानंद पार्कमध्ये १ हजार ६४१ चौरस फुटांचा प्लॉट क्र. ९ घेतल्याचे गुन्हे शाखेने उघडकीस आणले असून, त्याचा पावती करारनामा जप्त केला आहे. याशिवाय हर्षकुमारने शेअर बाजारातही एक कोटीची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. मैत्रीण अर्पिता वाडकर (वय २१) हिच्यासोबत त्याने परदेश वाऱ्याही केल्या. रशिया आणि इंडोनेशिया या देशांची सफर करत त्यांनी ‘मौजमजा’ केली.
हर्षकुमारने मैत्रीण अर्पितासोबत रशिया आणि इंडोनेशियाची सफर करून मजा केली. हर्षकुमार एकट्याने बँकॉक व अन्य तीन देशांत गेला होता. हर्षकुमारचा हिरेजडित गॉगल पोलिसांनी जप्त केला असून, त्याची किंमत १० लाख रुपये आहे. त्याच्याकडे आणखी एक इम्पोर्टेड गॉगल आहे. त्याची दांडी तुटली असल्याने तो परदेशात दुरुस्तीसाठी पाठवला होता. आतापर्यंत दहाहून अधिक महागडे चष्मे जप्त केले आहेत. महागडे कपडे आणि बुटांची खरेदीही केल्याचे तपासात समोर आले आहे. हर्षने केलेल्या प्रत्येक व्यवहाराची चौकशी केली जात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

