सोळाचाकी भरधाव ट्रक बनला यमदूत, सुतारकाम करणाऱ्या ५० वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडले, गांधेलीजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर महामार्गावर गांधेली गावाजवळ (ता. छत्रपती संभाजीनगर) सोळाचाकी भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२२ डिसेंबर) दुपारी घडली. मनोज दगडू चव्हाण (वय ५०, रा. शिवगड तांडा, चिकलठाणा) असे मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मनोज चव्हाण सुतार काम करत. ते एका परिचिताच्या दुचाकीवरून धुळे-सोलापूर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर महामार्गावर गांधेली गावाजवळ (ता. छत्रपती संभाजीनगर) सोळाचाकी भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२२ डिसेंबर) दुपारी घडली. मनोज दगडू चव्हाण (वय ५०, रा. शिवगड तांडा, चिकलठाणा) असे मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मनोज चव्हाण सुतार काम करत. ते एका परिचिताच्या दुचाकीवरून धुळे-सोलापूर हायवेवरून गांधेलीकडे जात होते. सोळाचाकी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. चिकलठाणा पोलीस ठाण्यातील अंमलदार विठ्ठल एडके आणि अजित तेकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर चालकाने ट्रक जागेवर सोडून पळ काढला. अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रक पोलिसांनी जप्त केला. अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे. मनोज चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यातील एका मुलीचे लग्न झालेले आहे.

मृतक दत्तात्रय शेळके, रा. पाचोड

पाचोड तरुणाला पुण्यात वाहनाने चिरडले…
पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात पाचोड येथील २३ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना शनिवारी (२१ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास घडली. दत्तात्रय परमेश्वर शेळके (वय २३, रा. पाचोड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दत्तात्रय नोकरीच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे राहत होता. लोणावळा येथील एका कंपनीत तो कामाला होता. ड्यूटी संपल्यानंतर शनिवारी रात्री घराकडे निघाला असता घर थोड्या अंतरावर राहिले असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. पुणे येथून त्याचे पार्थिव पाचोडला आणल्यानंतर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software