सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा छळ!; बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माहेरावरून कार घेण्यासाठी पैसे आण, अशी मागणी करत पतीसह सासरच्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा छळ केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी तिच्या २७ वर्षीय पतीसह सासरे, सासू आणि दीर अशा एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हा शनिवारी (१९ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे. हडको एन १३ वानखेडेनगरात माहेरी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माहेरावरून कार घेण्यासाठी पैसे आण, अशी मागणी करत पतीसह सासरच्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा छळ केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी तिच्या २७ वर्षीय पतीसह सासरे, सासू आणि दीर अशा एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हा शनिवारी (१९ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

हडको एन १३ वानखेडेनगरात माहेरी राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ती आई-वडिलांच्या घरी एक वर्षापासून राहत आहे. तिचे लग्न १३ जून २०२२ रोजी जैन मंदिर जटवाडा रोड, हर्सूल येथे झाले. सुरुवातीचे ३ ते ४ महिन्यांपर्यंत सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. नंतर पतीने फोरव्हिलर घेण्यासाठी आई-वडिलांकडून २ लाख रुपये आणण्याची मागणी केली. तिच्या आई-वडिलांनी पतीला दोन लाख रुपये पाठवले. काही दिवसांनी परत तिच्याकडे १ लाख रुपये मागण्यात आले. तिने पैसे आणण्यास असमर्थता व्यक्‍त केल्याने पती, सासरे, सासूने शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. नंतरच्या काळात तिला २०२३ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून पुण्याला नोकरी लागल्याने ती तेथे राहण्यासाठी गेली. तरीही तिचा छळ सुरूच ठेवला, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software