सेव्‍हनहिल उड्डाणपूल अन्‌ कर्णपुरा यात्रेजवळ भीषण अपघात; ४ महिन्यांच्या बाळासह ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्‍यू, शहर हळहळले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात दोन भीषण अपघातांत एका ७ वर्षीय चिमुकलीचा आणि ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्‍यू झाला आहे. अपघातानंतर रिक्षा उलटून तर दुसऱ्या घटनेत भरधाव टेम्‍पो यमदूत बनून आला होता. या घटना सेव्हनहिल उड्डाणपूल आणि कर्णपुरा यात्रेजवळ घडल्या. उभ्या कारला धक्का लागून रिक्षा उलटली. यात रिक्षातील प्रवासी महिला अन्‌ तिचे ४ महिन्यांचे बाळ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात दोन भीषण अपघातांत एका ७ वर्षीय चिमुकलीचा आणि ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्‍यू झाला आहे. अपघातानंतर रिक्षा उलटून तर दुसऱ्या घटनेत भरधाव टेम्‍पो यमदूत बनून आला होता. या घटना सेव्हनहिल उड्डाणपूल आणि कर्णपुरा यात्रेजवळ घडल्या.

उभ्या कारला धक्का लागून रिक्षा उलटली. यात रिक्षातील प्रवासी महिला अन्‌ तिचे ४ महिन्यांचे बाळ गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील चिंतामणी हार्डवेअर दुकानासमोर आज, १० ऑक्‍टोबरला सकाळी अकराला घडली. सुशांत सुदाम खुडे (वय ४ महिने) असे मृत्‍यू झालेल्या बाळाचे नाव असून, पार्वती सुदाम खुडे असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. मूळचे नांदेडचे सुदाम सखाराम खुडे रमानगर येथे राहतात. ते मजुरी करतात.

पत्नी पार्वती आणि ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन चिकलठाण्यातील मिनी घाटीत गेले होते. रिक्षाने घराकडे परतत असताना न्यू हनुमानगरात काम असल्याने ते सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळ उतरले. पत्नी पार्वती चिमुकल्या सुशांतला घेऊन पुढे निघाली. उड्डाणपूल ओलांडल्यावर चिंतामणी हार्डवेअर दुकानासमोर उभ्या कारला रिक्षाचा धक्का लागला. रिक्षा भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पुढे उभ्या दुसऱ्या कारला रिक्षा धडकली. यामुळे रिक्षा उलटून पार्वती आणि सुशांतच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्‍यान सुशांतचा मृत्यू झाला. या प्रकरणात जवाहरनगर पोलिसांनी रिक्षाचालक जगन्नाथ गोपीनाथ नवपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रस्ता ओलांडणाऱ्या ७ वर्षीय मुलीला विटांच्या भरधाव टेम्‍पोने चिरडले. तिचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना कर्णपुरा यात्रेजवळ आज, १० ऑक्‍टोबरला सकाळी ९ च्या सुमारास घडली. सोना सुलतान सोळंके (वय ७, रा. आसेगाव, ता.गंगापूर) असे मृत्‍यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कर्णपुरा यात्रेत खेळणी विक्रीसाठी सोळंकी कुटुंबीय आले आहे. ते यात्रेतच झोपडी करून राहतात. गुरुवारी सकाळी नऊला सोना आजीसोबत पदमपुऱ्याकडे आंघोळीसाठी गेली होती. परतताना रस्ता ओलांडत असतानाच रेल्वेस्टेशनकडून बाबा चौक उड्डापणुलाकडे भरधाव निघालेल्या विटांच्या टेम्पोने सोनाला चिरडले. तिचा जागीच मृत्‍यू झाला. मेंदूचा चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर चालकाने टेम्पो सोडत पळ काढला. छावणी पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software