सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट ट्रकने दुचाकीस्वार पोलीस पतीला तब्बल ५०० फूट फरपटत नेत चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर-वाळूज मुख्य रस्त्यावरील कामगार चौकात आज, १२ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडला. संजय जयसिंग घुणावत (वय ५०, रा. वाळूजवाडी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. ते […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट ट्रकने दुचाकीस्वार पोलीस पतीला तब्बल ५०० फूट फरपटत नेत चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर-वाळूज मुख्य रस्त्यावरील कामगार चौकात आज, १२ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडला.

संजय जयसिंग घुणावत (वय ५०, रा. वाळूजवाडी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षक होते. त्यांची पत्नी पोलीस खात्यात कार्यरत आहेत. संजय घुणावत पंढरपूरहून कामगार चौकातून वळत घेत होते. त्याचवेळी भरधाव ट्रकने (एमएच २६ एडी ४९९५) त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच २० एचई ०६३०) उडवले. धडक दिल्यानंतर ट्रकने ५०० फूट फरफटत नेल्याने घुणावत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी ट्रकची तोडफोड केली. ट्रकखाली अडकलेली दुचाकी बाहेर काढली. पोलिसांनी ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. संजय घुणावत यांचे चुलत भाऊ विजयसिंग राजपूत यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software