सुतगिरणी चौकात पकडले ४० लाख!; बिडकीनच्या व्यंकटेश पतसंस्थेची रक्‍कम; पण संशय वाटण्याचे कारण भक्‍कम…

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन (ता. पैठण) येथील व्यंकटेश मल्टिस्टेट बँकेच्या मॅनेजरकडून गारखेड्याच्या सूतगिरणी चौकात निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने कारच्या तपासणीदरम्यान ४० लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कडक सूचना असूनही ४० लाख रुपयांची मोठी रक्‍कम बाळगली जात होती. दोन दिवसांपासून ती बँकेत भरली नव्हती. त्‍यामुळे ही रक्‍कम एखाद्या उमेदवारासाठी तर वापरण्यात येणार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन (ता. पैठण) येथील व्यंकटेश मल्टिस्टेट बँकेच्या मॅनेजरकडून गारखेड्याच्या सूतगिरणी चौकात निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने कारच्या तपासणीदरम्यान ४० लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कडक सूचना असूनही ४० लाख रुपयांची मोठी रक्‍कम बाळगली जात होती. दोन दिवसांपासून ती बँकेत भरली नव्हती. त्‍यामुळे ही रक्‍कम एखाद्या उमेदवारासाठी तर वापरण्यात येणार नव्हती ना, असा संशय व्यक्‍त होत असून, त्‍यादृष्टीने पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून तपास करण्यात येत आहे.

बँक मॅनेजर सचिन सूरसिंग जाधव यांनी तपासणी पथकाला सांगितले, की पतसंस्थेच्या आंतरशाखा व्यवहाराकरिता ही रक्कम नेली जात आहे. मात्र आदर्श आचारसंहितेत रकमेचे हस्तांतरण करताना बँकांना क्यूआर दिला जातो. बँकेचे नाव, रक्‍कम कुठून कोणत्‍या शाखेत नेली जात आहे, ती रक्‍कम कोण घेऊन जात आहे, गाडी क्रमांक अशी सगळी माहिती क्‍यूआर कोडमध्ये असते. मात्र सचिन जाधव यांच्याकडे क्‍यूआर कोड नसल्याने ही रक्कम जप्त करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयाकडे दिल्याचे पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले.

ही कारवाई श्री. गिरासे यांच्यासह नोडल अधिकारी प्राजक्ता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी पथकाचे नसीम शेख, एकनाथ पडूळ, सचिन सोनी, श्याम उदावंत, पोलीस अंमलदार इंदलसिंग महेर यांनी केली. बँक मॅनेजर जाधव यांनी ५ नोव्‍हेंबरला एसबीआयमधून ही रक्‍कम काढून बिडकीन शाखेत ठेवली, नंतर गजानन महाराज मंदिर शाखेला गरज असल्याने ही रक्‍कम देण्यास जात असताना ही कारवाई झाल्याचे जाधव यांनी सांगितले. आढळलेली रक्‍कम शाखांतर्गत देवाणघेवाण आहे. या रकमेचा राजकीय संबंध नाही, असे व्यंकटेश बँकेचे चेअरमन कृष्णा मसुरे यांनी सांगितले.

मुलीच्या मेडिकलच्या ॲडमिशनसाठी आणलेले ५ लाख पकडले…
जिल्हाभरात निवडणूक आयोगाकडून सुमारे तीनशे वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाई होत असून, मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) रात्री आठला सूतगिरणी चौकात एका कारला पथकाने थांबवून तपासले असता कारच्या डिक्कीत पाच लाख रुपये मिळून आले. गाडीत असलेल्या पाटील नावाच्या व्यक्‍तीने सांगितले, की मुलीच्या मेडिकलच्या ॲडमिशनसाठी मुंबई येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँकेतून पैसे काढून आणले आहेत. मात्र त्‍याबाबतचे कोणतेही पुरावे पाटील यांच्याकडे नव्हते. त्‍यामुळे पथकाने ती रक्कम वरिष्ठ कोषागार कार्यालयात जमा केली आहे. आता या रकमेवर जिल्हा समितीकडून सुनावणी होईल. समाधानकारक खुलासा केला तरच पाटील यांना ती रक्कम परत मिळू शकेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software