सिडको एन १ मधील घरफोडीचा उलगडा… इंजिनिअर तरुणाने दोघांना हाताशी धरून मारला ८७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!; तिघांना वाळूज MIDC तून अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन-१ मध्ये सर्जिकल साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी शनिवारी (१३ जुलै) ला रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्‍यान तब्बल ८७ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले होते. या गुन्ह्याचा उगलडा शहर गुन्हे शाखेने ७२ तासांत केला असून, नाशिकच्या टोळीने हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक करून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन-१ मध्ये सर्जिकल साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी शनिवारी (१३ जुलै) ला रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्‍यान तब्बल ८७ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले होते. या गुन्ह्याचा उगलडा शहर गुन्हे शाखेने ७२ तासांत केला असून, नाशिकच्या टोळीने हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक करून त्‍यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

ऋषीकेश मधुकर काळे (वय २८), रोहन संजय भोळे (वय ३६, दोघे रा. गंधर्वनगरी, नाशिक) व आकाश दिनेश कोठे ( वय २७, रा. महात्मा फुलेनगर, देवळाई गाव, नाशिक) अशी ताब्‍यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. ऋषीकेश बीई (मेकॅनिक) झालेला आहे. रोहन, आकाश १२ वी उत्तीर्ण असल्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले. रोहन आणि ऋषीकेश अट्टल चोरटे आहेत.

निखील सुशिल मुथा (वय ४१, रा. एफ-सेक्टर सिडको एन-१ गरवारे स्टेडियएममागे) यांनी या प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्‍यांचे प्रोझोन मॉलच्या बाजूला गोल्डन सिटी सेंटर MIDC चिकलठाणा येथे डॉक्टरांना लागणाऱ्या सर्जिकल साहित्‍य विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी (१३ जुलै) रात्री आठला मुथा कुटुंबीयांना प्रोझोन मॉलमध्ये बूट खरेदी करायचे असल्याने निखिल यांच्यासह त्‍यांची पत्नी प्रियांका, आई व वडील, दोन्ही मुले घराला लॉक लावून आले होते.

खरेदी केल्यानंतर मुथा कुटुंब रात्री साडेनऊला घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्‍यांच्या पत्‍नीचे ८७ लाख ६९ हजार रुपयांचे सोने व हिऱ्याचे, चांदीचे व मोत्याचे दागिने व व आईचे कपाटातील २४ हजार रुपये व चांदीचे शिक्के व बाऊल चोरट्यांनी नेले होते. मुथा यांनी तातडीने पोलिसांना कळवले होते. ऋषीकेश काळे याला रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाट्यावरून ताब्‍यात घेतले. त्‍याच्या चौकशीतून आकाश कोठे व रोहन भोळे या दोघांच्या मुसक्या आवळल्या. तिघेही कॉलेजचे विद्यार्थी भासतात, हे विशेष. दरम्‍यान, घरफोडीचा उलगडा ७२ तासांत केल्याने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software