- Marathi News
- सिटी क्राईम
- सिडको उड्डाणपुलावर भीषण अपघात; स्कुटी दुभाजकाला धडकून तरुण ठार, मागे बसलेला गंभीर जखमी
सिडको उड्डाणपुलावर भीषण अपघात; स्कुटी दुभाजकाला धडकून तरुण ठार, मागे बसलेला गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलावर मानसी हॉटेलसमोर ताबा सुटून स्कुटी दुभाजकाला धडकल्याने तरुणाचे डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि जागीच मृत्यू झाला. त्याच्यामागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, 1 नोव्हेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. राहुल गायकवाड (रा. रोहिदासनगर, मुकुंदवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, गंभीर जखमीचे नाव विकी […]
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलावर मानसी हॉटेलसमोर ताबा सुटून स्कुटी दुभाजकाला धडकल्याने तरुणाचे डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि जागीच मृत्यू झाला. त्याच्यामागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, 1 नोव्हेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
राहुल गायकवाड (रा. रोहिदासनगर, मुकुंदवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, गंभीर जखमीचे नाव विकी रत्नपारखे असे आहे. तोही रोहिदासनगरात राहतो. एका मित्राच्या घरून त्यांनी स्कुटी घेतली होती. जालना रोडने सेवनहिलकडे जात असताना सिडको उड्डाणपुलावर चढताना कठड्याला स्कुटी धडकली.
अपघात इतका भीषण होता, डोक्याच्या मागील भागाला जबर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. विकीही गंभीर जखमी झाला. त्याच्या हात, पाय आणि तोंडाला जबर दुखापत झाली आहे. नागरिकांनी धावून दोघांना रुग्णालयात दाखल केले. पुंडलिकनगर पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी पोलीस ठाण्यात नेली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की राहुल आणि विकी दोघेही स्कुटीवरून जाताना हुल्लडबाजी करत होते. आजूबाजूच्या वाहनांचीही चिंता करत नव्हते. त्यातूनच राहुलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला.
