सहायक पोलीस आयुक्‍त-पोलीस अंमलदारात धक्‍काबुक्‍की!, छत्रपती संभाजीनगरातील प्रकाराने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एसएफएस शाळेतील निवडणूक कार्यालयात नाईट ड्युटीदरम्‍यान स्ट्राँग रुमवर पोलीस अंमलदार अंबादास राठोड गैरहजर दिसल्याने सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी जाब विचारला. यातून दोघांत जोरदार बाचाबाची झाली. प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले. इतरांनी मद्यस्थी करून वाद मिटवला. शनिवारी (९ नोव्‍हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी श्री. शिंदे यांनी पोलीस आयुक्‍त […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एसएफएस शाळेतील निवडणूक कार्यालयात नाईट ड्युटीदरम्‍यान स्ट्राँग रुमवर पोलीस अंमलदार अंबादास राठोड गैरहजर दिसल्याने सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी जाब विचारला. यातून दोघांत जोरदार बाचाबाची झाली. प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले. इतरांनी मद्यस्थी करून वाद मिटवला. शनिवारी (९ नोव्‍हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी श्री. शिंदे यांनी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय एसएफएस शाळेत उभारलेले आहे. उमेदवारांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह मतपेट्यांचे जबाबदारीचे साहित्य येथे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्राला स्थानिक ठाण्यांसह मुख्यालयाच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्मचारी चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावत आहेत का, यासाठी हजेरी घेतली जाते. मध्यरात्री एकला सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे रात्रपाळी तपासणीवर असताना त्यांनी स्ट्राँग रुमवरील बंदोबस्ताचा आढावा घेतला.

यावेळी अंमलदार अंबादास राठोड गैरहजर दिसले. चौकशी सुरू असतानाच ते हजर झाले. यामुळे शिंदे यांचा पारा चढला. राठोड यांनी परिसरातच असल्याची बाजू मांडली. मात्र, यातून त्यांच्यात वाद वाढून प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. इतरांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटविले. त्यानंतर राठोड यांची पहाटे घाटी रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करून ठाण्यात नोंद करण्यात आली. दरम्‍यान, या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना श्री. शिंदे म्‍हणाले, की कर्मचाऱ्याची तक्रार पोलीस आयुक्‍तांकडे करण्यात आली आहे. वाद किंवा इतर काहीही घडलेले नाही. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात सर्व वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software