सलग चौथी घटना : भरधाव स्‍कॉर्पिओने ४ वाहनांना उडवले, बाबा चौक ते एएस क्‍लब रस्‍त्‍यावरील थरार, दोघे जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नियंत्रण सुटलेल्या कार वारंवार छत्रपतीनगरवासियांच्या जिवावर बेतत आहेत. आकाशवाणी चौक, निरालाबाजार, ठाकरेनगरनंतर आता बाबा पेट्रोलपंप चौक ते ए. एस. क्लबदरम्‍यान अशीच घटना घडली. भरधाव स्कॉर्पिओ चालकाने अनेक वाहनांना हूल दिल्यानंतर दोन दुचाकी व एका कारला उडवले. यात दोघे जखमी झाले. त्‍यानंतरही स्कॉर्पिओचालक थांबला नाही. वाळूजच्या दिशेने सुसाट गेला. सोमवारी (३० […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नियंत्रण सुटलेल्या कार वारंवार छत्रपतीनगरवासियांच्या जिवावर बेतत आहेत. आकाशवाणी चौक, निरालाबाजार, ठाकरेनगरनंतर आता बाबा पेट्रोलपंप चौक ते ए. एस. क्लबदरम्‍यान अशीच घटना घडली. भरधाव स्कॉर्पिओ चालकाने अनेक वाहनांना हूल दिल्यानंतर दोन दुचाकी व एका कारला उडवले. यात दोघे जखमी झाले. त्‍यानंतरही स्कॉर्पिओचालक थांबला नाही. वाळूजच्या दिशेने सुसाट गेला. सोमवारी (३० सप्‍टेंबर) दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्‍यान हा अपघात घडला. हिट ॲण्ड रनच्या वाढत्‍या घटनांनी शहरात चिंतेची जागा आता दहशतीने घेतली आहे.

अब्दुल बासिद अब्दुल गणी (वय ३३, रा. शहागंज) बाबा पेट्रोलपंप चौकातून मोपेडने (क्र. एमएच २० एफएच ९५४९) पडेगावला जात असताना होलिक्रॉस शाळेसमोर मागून आलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओने त्यांना उडवले. गणी दूरवर फेकले जाऊन जखमी झाले. पुढे स्कॉर्पिओने कारसह (क्र. एमएच २० एमडब्ल्यू १४०३) आणखी एका दुचाकीस्वार व चारचाकीला धडक दिली. नंतर स्कॉर्पिओ वाळूजच्या दिशेने रस्त्यावरील प्रत्येक वाहनचालकाला हूल देत सुसाट गेली. दुचाकीवरील दाम्पत्यापैकी वडील व लहान मुलाच्या छाती व तोंडाला मार लागला. गणी यांनी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दिली आहे. मात्र त्‍यांना स्कॉर्पिओचा नंबर सांगता आला नाही. पोलीस आता स्कॉर्पिओचा शोध घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software