- News
- सिटी क्राईम
- संतापजनक… रस्त्याने जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीला दारूड्याने अचानक येऊन मारली मिठी!; जमावाने इतका चोपला...
संतापजनक… रस्त्याने जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीला दारूड्याने अचानक येऊन मारली मिठी!; जमावाने इतका चोपला की…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात शहरातील फाजलपुरा भागात एक संतापजनक घटना घडली आहे. रस्त्याने जाणाऱ्या २५ वर्षीय विवाहित युवतीला एका दारूड्याने अचानक येऊन मिठी मारली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने आरडाओरड करताच नागरिक धावून आले. त्यांनी या दारूड्याला इतके बदडले की त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली. ही घटना रविवारी (६ ऑक्टोबर) सकाळी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात शहरातील फाजलपुरा भागात एक संतापजनक घटना घडली आहे. रस्त्याने जाणाऱ्या २५ वर्षीय विवाहित युवतीला एका दारूड्याने अचानक येऊन मिठी मारली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने आरडाओरड करताच नागरिक धावून आले. त्यांनी या दारूड्याला इतके बदडले की त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली. ही घटना रविवारी (६ ऑक्टोबर) सकाळी घडली.
दुसऱ्या एका घटनेत रविवारी सकाळी आठला २५ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरड केल्याने पालकांनी तरुणाला रोखले असता त्याने तुमच्या मुलीला पळवून नेईल, अशी धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कमलेश प्रशांत धोंगडे (वय २५, रा. अरिहंतनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

