शहरात लुटमारीच्या घटना वाढल्‍या, ३ तरुणांनी ५० रुपयांसाठी १७ वर्षीय मुलावर चढवला हल्ला, नारेगाव रोडवरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात लुटमारीच्या घटना वाढत चालल्या असून, नारेगाव रोडवरील सिपेट कॉलेजसमोर १७ वर्षीय मुलावर ३ तरुणांनी हल्ला चढवला. तंबाखूची पुडी घेण्यासाठी ५० रुपये मागितल्यानंतर मुलाने नकार दिला होता. त्‍यामुळे संतप्त तरुणांनी त्‍याला बेदम मारहाण केली. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्‍याला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सोमवारी (२२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात लुटमारीच्या घटना वाढत चालल्या असून, नारेगाव रोडवरील सिपेट कॉलेजसमोर १७ वर्षीय मुलावर ३ तरुणांनी हल्ला चढवला. तंबाखूची पुडी घेण्यासाठी ५० रुपये मागितल्यानंतर मुलाने नकार दिला होता. त्‍यामुळे संतप्त तरुणांनी त्‍याला बेदम मारहाण केली. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्‍याला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सोमवारी (२२ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

आदित्य मिलिंद ससाने (वय १७, रा. मिसारवाडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्‍याची आई सविता मिलिंद ससाने (वय ३४) यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात हल्लेखोर आदित्य सातदिवे (रा. आंबेडकरनगर) व त्‍याचे दोन मित्र यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांचा शोध सुरू केला आहे. आदित्यचा हात फ्रॅक्‍चर झाला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राजू कोतवाल करत आहेत.

तरुणीचा पाठलाग
दुसऱ्या एका घटनेत, तरुणीचा एकजण वर्षभरापासून मेसेजद्वारे पाठलाग करीत होता. त्याने २० जुलै रोजी जबिंदा ग्राउंड येथे तिची छेड काढली. गोपाल आत्माराम खंदारे (वय २७) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी गोपालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software