शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार!, बजाजनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जेवण केल्यानंतर रात्री शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना मंगळवारी (२ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास बजाजनगरातील चिंचबन कॉलनीत घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्‍यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. योगिता महावीर पांडे (वय ५०, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जेवण केल्यानंतर रात्री शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना मंगळवारी (२ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास बजाजनगरातील चिंचबन कॉलनीत घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्‍यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

योगिता महावीर पांडे (वय ५०, चिंचबन कॉलनी, बजाजनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. जेवणानंतर त्या एकट्याच शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शिवराणा चौकाकडे पायी जात असताना श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरासमोर दुचाकीवरून डबलसीट आलेल्या दोघांनी योगिता यांच्याजवळ येताच दुचाकीचा वेग कमी केला. मागे बसलेल्याने योगिता यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे व ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून. त्यानंतर धूमस्टाइल दोघे पसार झाले.

योगिता पांडे यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाहनधारक व नागरिक धावून आले. मात्र तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले होते. चोरांचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर जोराचा धक्का दिल्याने योगिता पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, समाधान पाटील यांच्या पथकाने नाकेबंदी केली. बजाजनगर परिसर पिंजून काढूनही चोरटे मिळून आले नाहीत. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software