- News
- सिटी क्राईम
- विद्यापीठात लव्ह जिहाद; धर्मांधाने विद्यार्थिनीला व्हिडीओ कॉलद्वारे केली प्रेमाची मागणी, नंतर जाळ्या...
विद्यापीठात लव्ह जिहाद; धर्मांधाने विद्यार्थिनीला व्हिडीओ कॉलद्वारे केली प्रेमाची मागणी, नंतर जाळ्यात अडकत नाही पाहून मांडला छळ!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओव्हरगावची १७ वर्षीय पूजा पवार लव्ह जिहादची बळी ठरल्याच्या घटनेमुळे शहरात संताप असताना विद्यापीठातही अशाच स्वरुपाची एक घटना चर्चेत आली असून, विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात घेतलेल्या बोटचेप्या धोरणामुळे विद्यार्थिनी संतप्त झाल्या आहेत. हे प्रकरण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ऐरणीवर आणले असून, विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या नझीम पटेल या कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओव्हरगावची १७ वर्षीय पूजा पवार लव्ह जिहादची बळी ठरल्याच्या घटनेमुळे शहरात संताप असताना विद्यापीठातही अशाच स्वरुपाची एक घटना चर्चेत आली असून, विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात घेतलेल्या बोटचेप्या धोरणामुळे विद्यार्थिनी संतप्त झाल्या आहेत. हे प्रकरण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ऐरणीवर आणले असून, विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या नझीम पटेल या कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनासमोर गुरुवारी (२२ ऑगस्ट) दोन तास आंदोलन करून घोषणाबाजी केली. कुलगुरू हमसे डरते है, पुलिस को आगे करते है, कुलगुरू हमको पढने दो, देश को आगे बढने दो… अशा घोषणा विद्यार्थिनींनी दिल्या. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यावर कारवाई करायला कचरणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने आंदोलन केल्याबद्दल विद्यार्थ्यांवर मात्र तातडीने गुन्हे दाखल केले आहेत. महानगर सहमंत्री चिन्मय महाले आणि प्रदेशमंत्री वैष्णवी ढिवरे यांच्यासह १० ते १२ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांविरुद्ध विनापरवानगी आंदोलन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची राज्य सरकारने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरीय उत्कर्ष विद्यापीठ महोत्सव यंदा जळगावला झाला. विद्यापीठाच्या संघात एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीही जळगावला गेली होती. या संघासोबत गेलेल्या नझीम पटेल या कंत्राटी कर्मचाऱ्याने त्या विद्यार्थिनीवर लव्ह जिहादचे जाळे फेकले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले होते. मात्र महोत्सव झाल्यावर सर्व विद्यार्थी घरी गेल्यावर नझीमने तिला व्हिडीओ कॉल करून लैंगिक छळ केला. ती जाळ्यात अडकत नसल्याचे पाहून तिचा छळ मांडला.
विद्यापीठाने या प्रकरणात गांभीर्य न दाखवल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्त्वात विद्यार्थी गुरुवारी थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शिरले. दोन तास जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. डॉ. फुलारी यांनी विशाखा समितीच्या सदस्यांना बोलावून घेतले. तक्रारदार मुलीलाही बोलावून घेतले. तिने सर्व पुरावे दिले. सायंकाळी उशिरा विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले आहे. मात्र विनापरवानगी आंदोलन केल्याबद्दल विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतापात भर पडली आहे. अन्यायाविरुद्ध आक्रोश करणेही गुन्हा आहे का, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला असून, राज्य सरकारने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अभाविपची प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे म्हणाली, की विद्यापीठ प्रशासनाने कर्मचाऱ्याची पाठराखण केली. पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजेत.
पोलिसांकडूनही विद्यार्थिनीची फरपट…
विद्यापीठाकडून विद्यार्थिनीला पोलिसांत तक्रार करायला सांगण्यात आल्याने ती बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेली. तेव्हा बेगमपुरा पोलिसांनी तिची फिर्याद घेण्याऐवजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात जायला सांगितले. नव्या नियमानुसार पीडिताला कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करता येते. ती नंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येते. बेगमपुरा पोलिसांनी तिची फरपट का केली, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

