विकृतीचा कळस… बर्थ डेनिमित्त फेसबुकवर टाकलेले शिक्षिकेचे फोटो अश्लील करून दिली लोकांसाठी ऑफर!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील एका ४९ वर्षीय शिक्षिकेच्या भावाने बर्थ डेनिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा फोटो फेसबुकवर टाकला. कुणीतरी विकृताने तोच फोटो उचलून फेक खात्‍यावर पोस्ट केला आणि एका रात्रीसाठी लोकांना ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात विकृताविरुद्ध शनिवारी (२४ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला असून, त्‍याचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील एका ४९ वर्षीय शिक्षिकेच्या भावाने बर्थ डेनिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा फोटो फेसबुकवर टाकला. कुणीतरी विकृताने तोच फोटो उचलून फेक खात्‍यावर पोस्ट केला आणि एका रात्रीसाठी लोकांना ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सिडको एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात विकृताविरुद्ध शनिवारी (२४ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला असून, त्‍याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, १९ ऑगस्टला वाढदिवसानिमित्त शिक्षिकेचा फोटो त्‍यांच्या भावाने वाढदिवसानिमित्त फेसबुकवर टाकला आणि शुभेच्छा दिल्या. हाच फोटो एका महिलेच्या फेक खात्‍यावरून पोस्ट करत विकृताने एक मोबाइल नंबर देत रात्रीसाठीची ऑफर दिली. ही बाब त्‍यांना नातेवाइक युवतीकडून मिळाल्यानंतर त्‍यांनी तातडीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक गौतम पातारे करत आहेत.

अल्पवयीन मुलीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर…
गंगापूर तालुक्‍यातील शिरेगाव येथे अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी करण्यात आल्याचा व तिचा पाठलाग करत विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिल्लेगाव येथील ६ तरुणांविरुद्ध रविवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी शिल्लेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीचे फोटो आदित्य रमेश कराळे याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. रविवारी शिरेगाव येथे दुपारी १२ च्या तिचा पाठलाग करून विनयभंग केला. तिच्या वडिलांनी जाब विचारला असता त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून आदित्य रमेश कराळे व त्‍याचे साथीदार कार्तिक भुसारे, राहुल कराळे, उमेश भुरे, संदीप भुरे, बापू भागिनाथ कराळे (सर्व रा. शिल्लेगाव) यांच्या विरुद्ध शिल्लेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software