वाळूज MIDC त मंगळसूत्र चोरांचा हैदोस; नोकरदार महिलेनंतर आता मुख्याध्यापिकेचे मंगळसूत्र हिसकावून सुसाट!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत सध्या मंगळसूत्र चोरांनी हैदोस घातला आहे. मंगळवारी सायंकाळी एका नोकरदार महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर बुधवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी सातला मुख्याध्यापिकेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना समोर आली आहे. त्‍यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगावच्या न्यू शहीद भगतसिंग शाळेत भारती सुभाष साळुंके (रा. बजाजनगर) मुख्याध्यापिका आहेत. बुधवारी सायंकाळी मैत्रिणीला भेटण्यासाठी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत सध्या मंगळसूत्र चोरांनी हैदोस घातला आहे. मंगळवारी सायंकाळी एका नोकरदार महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर बुधवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी सातला मुख्याध्यापिकेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना समोर आली आहे. त्‍यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रांजणगावच्या न्यू शहीद भगतसिंग शाळेत भारती सुभाष साळुंके (रा. बजाजनगर) मुख्याध्यापिका आहेत. बुधवारी सायंकाळी मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्या. मैत्रिण घरी नसल्याने त्या जयभवानी चौक ते आम्रपाली बुद्धविहार रस्त्याने पायी येत होत्या. सायंकाळी साडेसातला मागून काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. भारती यांनी मंगळसूत्र पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने हिसकावून मंगळसूत्र तोडून घेत पळ काढला.

भारती यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी नोकरदार महिला मीनाक्षी नारायण दोमाटे (रा. त्रिमूर्ती चौक, बजाजनगर) यांचे मंगळसूत्र चोरट्यांनी अशाच पद्धतीने हिसकावून पळ काढला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविले होते. त्‍यानंतर सलग दुसरी घटना घडल्याने महिलांत दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी मंगळसूत्र चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software