वाळूज MIDC तून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी आणि विटावा येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुलींचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. रांजणगाव शेणपुंजीतील ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली, की त्यांची १६ वर्षे ३ महिने वयाची नववीत शिकणारी मुलगी रविवारी (१ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी आणि विटावा येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुलींचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

रांजणगाव शेणपुंजीतील ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली, की त्यांची १६ वर्षे ३ महिने वयाची नववीत शिकणारी मुलगी रविवारी (१ सप्‍टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेली. तिची दिवसभर घरी येण्याची वाट पाहिली. ती घरी न आल्याने तिचा परिसरात शोध घेतला. नातेवाइक, मैत्रिणींकडे, मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन भागात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिला कुणीतरी फूस लावून पळून नेल्याची खात्री झाल्याने अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आला. मुलीने जाताना निळा टॉप व पांढरी पँट घातलेली होती. पायात गुलाबी रंगाचा बूट होता, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

दुसऱ्या घटनेत विटावा (ता. गंगापूर) येथील ४४ वर्षीय व्यक्‍तीने दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली १७ वर्षीय मुलगी राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली. ती परत घरी आली नाही. तिचा परिसरात, नातेवाइकांकडे शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. अखेर मंगळवारी (३ सप्‍टेंबर) पोलिसांत अपहरणाची तक्रार देण्यात आली. मुलगी घरातून जाताना पांढरा पंजाबी ड्रेस घालून गेली होती, असेही तक्रारीत म्‍हटले आहे. या घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार संजय पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software