वाळूज MIDC तील घाणेगावमध्ये टवाळखोरांचा वाढता त्रास; दोन शाळकरी मुलींची छेड काढली, वाढत्‍या त्रासामुळे मुली धास्तावल्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील घाणेगाव येथील शाळकरी मुलींना टवाळखोरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका मुलीची छेड काढण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी आणखी एका मुलीला जबरदस्ती दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्‍न एका टवाळखोराने केला. वाढत्‍या घटनांमुळे मुली धास्तावल्या असून, दामिनी पथकाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेष म्‍हणजे, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील घाणेगाव येथील शाळकरी मुलींना टवाळखोरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका मुलीची छेड काढण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी आणखी एका मुलीला जबरदस्ती दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्‍न एका टवाळखोराने केला.

वाढत्‍या घटनांमुळे मुली धास्तावल्या असून, दामिनी पथकाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेष म्‍हणजे, पालक बदनामीपोटी समोर येत नसल्याने टवाळखोरांचे फावते आहे. त्‍यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. टवाळखोराने मुलीची छेड काढत दुचाकीवर बसण्यासाठी जबरदस्ती केली. घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्याने नागरिक मदतीला धावले. त्‍यामुळे टवाळखोर संघर्षनगरमार्गे नारायणपूरवाडीच्या दिशेने सुसाट निघून गेला. १५ दिवसांतच छेडछाडीच्या दोन घटना घडल्याने संताप व्यक्‍त केला जात आहे. घाणेगावची शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. साडेपाचशे मुले-मुली शिकतात. १७ शिक्षक असून, १० शिक्षिका आहेत.

वृद्धाने काढली तरुणीची छेड
बायजीपुऱ्यात ६० वर्षीय वृद्धाने तरुणीची छेड काढल्याचा प्रकार १८ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता घडला. अब्दुल माजीद अब्दुल हाफिज (रा. बायजीपुरा) असे संशयिताचे नाव आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार, अब्दुलने आधी तिला स्पर्श केला. त्यानंतर हात पकडून अश्लील कृत्‍य केले. तरुणीने जिन्सी ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software