वाळूजजवळ दी बर्निंग कारचा थरार…कुटुंब नशिब बलवत्ता म्हणून बचावले…!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- नगर महामार्गावरील शिवराई फाट्यावर मंगळवारी (२४ जुलै) रात्री आठच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमधील ४ प्रवासी बचावले. आगीत कार भस्मसात झाली. पुणे येथून नारायण बाजीराव माळी (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना) हे पत्नी व दोन मुलांसह कारने गावी जात होते. नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- नगर महामार्गावरील शिवराई फाट्यावर मंगळवारी (२४ जुलै) रात्री आठच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमधील ४ प्रवासी बचावले. आगीत कार भस्मसात झाली.

पुणे येथून नारायण बाजीराव माळी (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना) हे पत्नी व दोन मुलांसह कारने गावी जात होते. नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना वाळूजजवळील शिवराई फाट्याजवळ कारमधून धूर निघायला सुरुवात झाली. माळी यांनी प्रसंगावधान राखून तातडीने कार थांबवत पत्नी व मुलांना बाहेर काढले. त्यानंतर कारचा अक्षरशः भडका उडाला. नागरिक, वाहनधारकांनी लगतच्या हॉटेलमधून पाणी आणून आग विझवणे सुरू केले. वाळूज पोलीस ठाण्याचे अंमलदार स्‍नेहलकुमार गवळी, प्रल्हाद गोहाळे, दशरथ खोसरे यांनी घटनास्‍थळी येऊन अग्निशामक दलाला कळवले. वाळूज अग्निशामक दलाच्या पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून गेली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software