- News
- सिटी क्राईम
- ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकत नाही म्हणून इतके छळले की १६ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन केली आत्म...
‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकत नाही म्हणून इतके छळले की १६ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या!; पूजाच्या आत्महत्येप्रकरणी कासीम पठाणविरुद्ध गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लव्ह जिहादच्या मानसिकतेने विकृती इतकी खालच्या थराला गेली, की नराधमाने तिचे जगणे अवघड केले. त्याचा त्रास असह्य झाल्याने १६ वर्षांच्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहराजवळील ओव्हर गावात समोर आली आहे. माझ्यासोबत प्रेम कर नाहीतर तुझ्या भावाला जीवे मारेल अशी धमकी नराधम देत होता, असे समोर येत […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लव्ह जिहादच्या मानसिकतेने विकृती इतकी खालच्या थराला गेली, की नराधमाने तिचे जगणे अवघड केले. त्याचा त्रास असह्य झाल्याने १६ वर्षांच्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहराजवळील ओव्हर गावात समोर आली आहे. माझ्यासोबत प्रेम कर नाहीतर तुझ्या भावाला जीवे मारेल अशी धमकी नराधम देत होता, असे समोर येत आहे. हर्सूल पोलिसांनी रविवारी (१८ ऑगस्ट) रात्री ११ ला या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत मुख्य संशयित नराधमाला अटक केली आहे. त्याआधी आरोपीच्या अटकेसह संपूर्ण कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी घाटी रुग्णालयासह हर्सूल पोलीस ठाण्यात नातेवाइकांसह गावकऱ्यांचा मोठा जमाव जमला होता.
गेल्या ८ महिन्यांपासून कासीम पठाण तिला त्रास देत होता. पूजाला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविण्यासाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावरही ती ऐकत नसल्याचे पाहून तो धमकीवर उतरला. प्रेम कर नाहीतर तुझ्या भावाला जीवे मारेल, अशी धमकी तो तिला देऊ लागला. त्यामुळे पूजा दहशतीखाली आली होती. ही बाब तिने घरी सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी कासीमला समजावून सांगितले होते. मात्र लव्ह जिहादच्या विकृतीने पछाडलेल्या कासीमने पूजाला त्रास देणे सुरूच ठेवले. हा त्रास असह्य झाल्याने पूजाने रविवारी दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांना कळताच त्यांनी पूजाला बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
संतप्त कुटुंबीयांनी आरोपीच्या अटकेसाठी घाटी रुग्णालयात संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी बेगमपुरा पोलिसांनी घाटीत धाव घेतली. हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी कारवाईचे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मुख्य आरोपीसह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा नोंदविण्यासाठी हर्सूल पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत जमावाने ठाण मांडले होते. रात्री ११ ला कासीमला पोलिसांनी अटक केली व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यानंतर ग्रामस्थांचा संताप कमी झाला आणि ते पोलीस ठाण्यासमोरून हलले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

