लघुउद्योजक बालाजी नन्‍नवरे यांच्‍या आत्‍महत्‍येने वाळूज MIDC हादरली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीच्‍या बजाजनगरातील रहिवासी लघुउद्योजक, सिद्धी एंटरप्रायजेसचे मालक बालाजी नागनाथ नन्नवरे (वय ४७) यांनी आत्‍महत्‍या केल्याचे बुधवारी (२५ डिसेंबर) पहाटे समोर आल्याने खळबळ उडाली. आर्थिक अडचणीत सापडल्याने त्‍यांनी आत्‍महत्‍या केल्याचे सांगण्यात आले. नन्‍नवरे हे देवदूत हौसिंग सोसायटीत कुटुंबासह राहत होते. ते मूळचे तुळजापूरचे होते. त्‍यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीच्‍या बजाजनगरातील रहिवासी लघुउद्योजक, सिद्धी एंटरप्रायजेसचे मालक बालाजी नागनाथ नन्नवरे (वय ४७) यांनी आत्‍महत्‍या केल्याचे बुधवारी (२५ डिसेंबर) पहाटे समोर आल्याने खळबळ उडाली. आर्थिक अडचणीत सापडल्याने त्‍यांनी आत्‍महत्‍या केल्याचे सांगण्यात आले.

नन्‍नवरे हे देवदूत हौसिंग सोसायटीत कुटुंबासह राहत होते. ते मूळचे तुळजापूरचे होते. त्‍यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून, मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे तर छोटी मुलगी आठवीत आहे. बुधवारी पहाटे पाचला झोपेतून उठलेल्या पत्नीला पती बेडरूममध्ये न दिसल्याने त्यांनी स्वयंपाकघरात पाहिले असता नन्‍नवरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. ते पाहून त्‍यांनी हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी धावून नन्‍नवरे यांना फासावरून उतरवून घाटी रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्‍यांना मृत घोषित केले. बालाजी नन्नवरे १७ वर्षांपूर्वी ते वाळूज औद्योगिक परिसरात आले होते.

सुरुवातीस ते कंपनीत काम करत होते. नंतर भाड्याच्या ठिकाणी सिद्धी एंटरप्राइजेस नावाने टूल कटिंगचे दुकान सुरू केले. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडले. त्‍यानंतर ते सावरलेच नाहीत. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बालाजी यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास जवळचे मित्र, नातेवाइकांना व्हॉट्स अॅपवर मेसेज टाकला. माझा शेवटचा रामराम… असे मेसेजमध्ये लिहिले होते. मित्र व नातेवाइकांनी मेसेज पाहिला तेव्हा खूप उशीर झाला होता. गळफास घेण्यापूर्वी त्‍यांनी सुसाईड नोट लिहिली. ती त्यांच्या खिशात पोलिसांना सापडली. त्यात माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, मी आर्थिक अडचणीत असल्याने आणि माझ्यावर कर्ज अधिक झाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्‍हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software