रॅडिको दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई : ठेकेदारासह कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीतील रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारासह कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात करमाड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी (१७ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या सुरक्षा विभागाचा सहायक व्यवस्थापक सुरेंद्र खैरनार, देखभाल दुरुस्ती विभागाचा सहायक व्यवस्थापक महादेव पाटील आणि ठेकेदार ज्ञानेश्वर रिठे यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. रॅडिको कंपनीत १५ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीतील रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारासह कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात करमाड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी (१७ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीच्या सुरक्षा विभागाचा सहायक व्यवस्थापक सुरेंद्र खैरनार, देखभाल दुरुस्ती विभागाचा सहायक व्यवस्थापक महादेव पाटील आणि ठेकेदार ज्ञानेश्वर रिठे यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. रॅडिको कंपनीत १५ नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास मका साठवलेली टाकी (सायलो) फुटून मकाखाली ४ मजुरांचा दबून मृत्‍यू झाला होता, तर चौघे जखमी झाले आहेत. दत्तात्रेय लक्ष्मण बोदरे (वय ३५, मूळ रा. वाकला, ता. वैजापूर ह. मु. कुंभेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर), किसन सर्जेराव हिरडे (वय ४५, रा. गोपाळपूर, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर), विजय भीमराव गवळी (वय ४५, रा. अशोकनगर, चिकलठाणा परिसर) आणि संतोष भास्कर पोपळघट (वय ३५, रा. भालगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. वाल्मिक पांडुरंग शेळके (वय ३७, रा. कुंभेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर), प्रशांत मधुकर काकड (वय ३६, रा. सिडको परिसर, छत्रपती संभाजीनगर), संदीप ज्ञानेश्वर घोडगे (वय ४७, रा. शेंद्रा), प्रशांत सोनवणे (वय २९, रा. पाचोरा) अशी जखमी असलेल्या कामगारांची नावे आहेत. त्‍यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान आणि नोकरी देण्याचा निर्णय यापूर्वीच कंपनीने घेतला आहे. कंपनीचे कनिष्ठ व्यवस्थापक प्रकाश काकड (रा. एन-९, सिडको) यांनी रविवारी करमाड पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली.

काय म्‍हटलंय तक्रारीत…
मका साठवण्याची टाकी (सायलो) खालून फुटल्यामुळे दोन दिवसांपासून मकाची गळती होत होती. तिन्ही आरोपींनी दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती सुरक्षा पुरवली नाही. कामगारांना कोणतेही मार्गदर्शन, प्रशिक्षण न देता अपुऱ्या साधनसामग्रीचा वापर करून काम करायला भाग पाडले. यातून जीवितहानी होऊ शकते यांची जाण असताना देखील आरोपींनी उपाययोजना केल्या नाहीत. दुर्घटना घडली त्यादिवशी सकाळी दहा वाजता टाकीचे वेल्डिंगचे काम सुरू करण्यात आले होते. ५० फूट उंचीच्या टाकीला ३० फुटांच्या उंचीवर वेल्डिंग करण्यात येत होते. अचानक दुपारी अडीच वाजता मोठा स्फोटासारखा आवाज होऊन ही टाकी कोसळली.

काय आहे घटना…
रॅडिको कंपनी मद्यनिर्मिती करते. मद्यनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात मका साठवून ठेवला होता. ट्रकने आणलेली मका शेडमध्ये प्रत्येकी ३ हजार मेट्रिक टनाच्या दोन टाक्यांत साठवली जाते. या टाक्या लोखंड आणि अ‍ॅल्युमिनियमच्या असून, त्यातील एका टाकीला लिकेज होते. त्‍याला कपडा लावून ठेवलेला होता. ५० फुटांच्या या टाकीला ३० फुटांच्या उंचीवर लिकेज दुरुस्तीसाठी वेल्डिंग करण्यात येत होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक टाकी फुटली. मोठा आवाज झाला. मकाचे दाणे दूरपर्यंत उधळले. यावेळी चार मजूर शेडमध्ये टाकीजवळ तर १२ जण आजूबाजूला होते. मका चौघांच्या अंगावर कोसळला. दबून जागीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेडही कोसळले. मका घेऊनही आलेला ट्रकही शेडजवळच उभा होता. ट्रकमधून मका खाली करणारे मजूरही दबले. पण त्यांच्या मदतीला वेळीच धावून अन्य मजुरांनी त्यांच्यासह ट्रकचालकाला वाचवले. त्‍यातील चौघांची प्रकृती अत्‍यवस्थ आहे. या टाकीचे आयुष्य २५ वर्षे असूनही १५ वर्षांतच फुटली. मका साठविण्याची टाकी (सायलो) चिरलेली होती. शिडीचा वापर करून तिला वेल्डिंग केले जात होते. टाकीत मकाचा प्रचंड दबाव होता. वेल्डिंग सुरू असतानाच टाकीचा पत्रा टराटरा फाटला आणि हजारो टन मका खाली काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडला. रॅडिको कंपनी सन २००८ पासून कार्यरत आहे. कंपनीत रोज ७०० ते ८०० कामगार काम करतात.

चार कुटुंबे वाऱ्यावर…
मृतक किसन हिरडे फिटर-वेल्डर होते. चार वर्षांपासून तिथे काम करत होते. या टाकीला वेल्डिंग करण्यासाठी ते गेले. त्‍यांना तीन मुले, एक मुलगा, तर दोन मुली आहेत. मुलाचे आणि एका मुलीचे लग्न झालेले आहे. एक मुलगी शिकत आहे. घरी शेती नाही. पत्‍नी मोलमजुरी करते. दत्तात्रय बोदरे मूळचे वैजापूरच्या वाकलाचे आहेत. ते एकटेच कुंभेफळ येथे आई-वडिलांसोबत राहत होते. २०१५ साली लग्न झाले होते. त्‍यांना मूलबाळ नाही. त्‍यांच्याकडे शेतीही नाही. विजय गवळी ६ वर्षांपासून कंपनीत कामाला होते. त्‍यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगी आठवीत शिकते, तर मुलगा अकरावीत आहे. त्‍यांच्याकडेही शेती नाही. त्‍यांच्या पश्चात पत्‍नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. संतोष पोपळघट हे दोन वर्षांपासून काम करत होते. त्‍यांच्याकडे मेंटेनन्सची जबाबदारी होती. घटनेवेळी ते टाकीला पॅच मारत होते. त्‍यांना तीन मुली आहेत. शेती नाही. त्‍यांची पत्‍नी व आई-वडील मोलमजुरी करतात. मृतकांपैकी तिघे कंत्राटी ठेकेदाराचे तर एक कामगार कंपनीचा पूर्णवेळ कर्मचारी होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software