रामगिरी महाराजांविरुद्ध छत्रपती संभाजीनगरातही गुन्हा दाखल

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्‍तव्‍य केल्याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात सोमवारी (१९ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. मुफ्ती महंमद मोईसोद्दीन कासमी (६१) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. महंत रामगिरी महाराज यांनी सिन्‍नर तालुक्‍यातील पांचाळे गावात प्रवचनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्‍यामुळे वैजापूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्‍यात ठिकठिकाणी हजारोंचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्‍तव्‍य केल्याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात सोमवारी (१९ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. मुफ्ती महंमद मोईसोद्दीन कासमी (६१) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली.

महंत रामगिरी महाराज यांनी सिन्‍नर तालुक्‍यातील पांचाळे गावात प्रवचनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्‍यामुळे वैजापूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्‍यात ठिकठिकाणी हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता. त्‍यांनी वक्‍तव्‍याचा निषेध करत रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली होती. यापूर्वी रामगिरी महाराजांविरुद्ध नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर, नगरच्या तोफखाना आणि संगमनेर, मुंबईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्‍यानंतर आता सोमवारी छत्रपती संभाजीनगरातही गुन्हा दाखल झाला आहे.

आपल्या वक्‍तव्‍याबद्दल टीव्ही वाहिन्यांशी बोलताना रामगिरी रामगिरी महाराज यांनी स्‍पष्टीकरण दिले आहे. ते म्‍हणाले, की तेढ निर्माण होण्यासारखे मी काही बोललो नाही. दीड तासाचे प्रवचन होते. त्यातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदूंवर अत्याचार होतात. त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहिले पाहिजे, असे मी बोललो. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्‍यान, तणावानंतर रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढविण्यात आली असून, सराला बेट मठाबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software