राखी पौर्णिमेलाच बहीण-भावाची ताटातूट…बहिणीला घ्यायला आलेल्या भावाला कारने चिरडले, छत्रपती संभाजीनगरची हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऐन राखी पौर्णिमेलाच बहीण- भावाची ताटातूट झाली. पुण्यावरून येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी भाऊ बाबा पेट्रोलपंप चौकात (महावीर चौक) आला… बहिणीची वाट पाहत असतानाच भरधाव कारने त्‍याला चिरडले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) घडली. वैभव सुधाकर कुलकर्णी (वय ५५, रा. सह्याद्री कॉर्नर, मल्हार चौक, पुंडलिकनगर) असे मृत्‍यू […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऐन राखी पौर्णिमेलाच बहीण- भावाची ताटातूट झाली. पुण्यावरून येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी भाऊ बाबा पेट्रोलपंप चौकात (महावीर चौक) आला… बहिणीची वाट पाहत असतानाच भरधाव कारने त्‍याला चिरडले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) घडली.

वैभव सुधाकर कुलकर्णी (वय ५५, रा. सह्याद्री कॉर्नर, मल्हार चौक, पुंडलिकनगर) असे मृत्‍यू झालेल्या भावाचे नाव आहे. ते खासगी कंपनीत अभियंता होते. त्यांची बहीण अंजली वाघदरीकर या राखी पौर्णिमेसाठी बसने येणार होत्या. त्यांना घेण्यासाठी वैभव कुलकर्णी थांबले होते. त्याचवेळी भरधाव कारने (एमएच २० एफवाय १९८५) समोरील कारला धडक दिली. ती कार वैभव यांना धडकली. नागरिकांनी धावून वैभव यांना तातडीने घाटी रुग्णालयात नेले. मात्र तपासून डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. वैभव यांना घाटीत नेल्यानंतर लगेचच बस आली आणि अंजली बसमधून उतरून भावाला कॉल करत होत्या. वैभव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software