युवकाने घरात घुसून महिलेचे फाडले कपडे; रांजणगाव शेणपुंजीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३० वर्षीय युवकाने ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचे कपडे फाडत अश्लील कृत्‍य केल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे २४ ऑक्टोबरला सायंकाळी घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल गायकवाड (वय ३०, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे युवकाचे नाव आहे. तक्रारदार महिला तिच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३० वर्षीय युवकाने ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचे कपडे फाडत अश्लील कृत्‍य केल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे २४ ऑक्टोबरला सायंकाळी घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विशाल गायकवाड (वय ३०, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे युवकाचे नाव आहे. तक्रारदार महिला तिच्या ११ वर्षांच्या मुलासह भाड्याने खोली करून राहते. २४ ऑक्टोबरला सायंकाळी ती व तिचा मुलगा घरी असताना विशाल तिच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला. महिलेने त्‍याला जाब विचारला असता त्‍याने तिच्या घरात घुसून मारहाण सुरू केली. तिचे कपडे फाडून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील महिलांनी धाव घेऊन तिची सुटका केली. यावेळी विशालला महिलेच्या ओळखीच्या नीलेश खंदारे यांनी जाब विचारला असता त्यांनासुद्धा शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केल्याने महिलेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software