- Marathi News
- सिटी क्राईम
- यंदाची शहरातील सर्वांत मोठी घरफोडी!; अवघ्या तासभरात ७९ तोळे दागिन्यांसह ११ लाखांवर डल्ला!!, हनुमानन...
यंदाची शहरातील सर्वांत मोठी घरफोडी!; अवघ्या तासभरात ७९ तोळे दागिन्यांसह ११ लाखांवर डल्ला!!, हनुमाननगरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : यंदाची सर्वांत मोठी घरफोडी सोमवारी (१ जुलै) मध्यरात्री सव्वा ते सव्वा दोनच्या दरम्यान तीन चोरांनी मिळून हनुमाननगरात केली. मंडप व्यावसायिकाचे घर फोडून तब्बल ७९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ११ लाख ८ हजार रोख रक्कम असा एकूण ६७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला, तोही केवळ एक कोयंडा तोडून. हनुमाननगरच्या गल्ली क्रमांक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : यंदाची सर्वांत मोठी घरफोडी सोमवारी (१ जुलै) मध्यरात्री सव्वा ते सव्वा दोनच्या दरम्यान तीन चोरांनी मिळून हनुमाननगरात केली. मंडप व्यावसायिकाचे घर फोडून तब्बल ७९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ११ लाख ८ हजार रोख रक्कम असा एकूण ६७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला, तोही केवळ एक कोयंडा तोडून.
सोमवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास दुचाकीवर तिघे जण आले. एक जण दुचाकीजवळ खालीच थांबला. शिंदे यांच्या शेजारच्या घरासमोर पत्र्याचे शेड आहे. त्या शेडवरून दोघांनी रात्री १:१५ वाजता पहिल्या मजल्यावर उडी मारून प्रवेश केला. अगदी सहज कडी-कोयंडा तोडून मुख्य घरात प्रवेश केला. तिसऱ्या मजल्यावरील खोलीला लॅच लॉक होते. लॅचलॉकच्या आठ्या असलेला भाग चौकटीपासून चोरांनी उखडून टाकलेल्या दिसल्या.
दुसऱ्या मजल्यावरील चोरी : सोन्याचे ३ तोळे वजनाचे ब्रेसलेट, प्रत्येकी अडीच तोळ्याच्या २ अंगठ्या, १ तोळ्याची एक अंगठी, प्रत्येकी ५ तोळ्यांचे दोन ब्रेसलेट, ५ तोळ्यांच्या २ सोनसाखळ्या, साडेसात तोळ्याचे गंठण, १ तोळ्याची कर्णफुले, साडेचार तोळ्यांची सोनसाखळी, ३ तोळ्यांचे १० सोन्याचे शिक्के, ९ लाख ६८ हजार रोख रक्कम.
लॅपटॉप नको, टीव्ही हवा…
चोरांनी तीन लॅपटॉप तसेच सोडले. मात्र, जाताना तिसऱ्या मजल्यावरील बेडरूममधील ३२ इंची टीव्हीही घेतला. चोरट्यांनी केवळ मौल्यवान वस्तू असलेल्या खोल्यांनाच लक्ष्य केले. ऐवज नसलेल्या खोलीतही ते गेले नाहीत. शिंदे यांच्या घराला कुलूप असल्याचे रस्त्यावरून दिसत नाही. दूधवाल्याला शिंदे यांनी गावी जात असल्याचे सांगितले होते. वृत्तपत्रे मात्र खिडकीत लटकवलेली होती.
भाग्यनगरात महिला डॉक्टरचे घर फोडले…
भाग्यनगरातही महिला डॉक्टरचे घर फोडून ५४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (१ जुलै) सायंकाळी घडली. भाग्यनगरातील घर नंबर ७५ येथे डॉ. प्रिया भाले राहतात. त्यांच्या घरातून चोरट्यांनी चांदीची वाटी, देव, गणपती, बाळकृष्ण, पंचपाळे तसेच रोक रक्कम ५ हजार, पाण्याची विद्युत मोटार आणि १५ हजार रुपये किमतीचा आयफोन असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
