मोठी बातमी : होलिक्रॉस इंग्लिश स्कूलला मनमानी भोवली; मुख्याध्यापिकेसह स्‍कूल मॅनेजमेंट अन्‌ तत्‍कालिन शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल, विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याचे प्रकरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हा परिषद शिक्षण विभागाची लाडोबा ठरलेल्या होलिक्रॉस इंग्लिश स्कूलच्या मनमानीला अखेर न्यायालयाच्या आदेशानेच चाप बसणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे या शाळेच्या मुख्याध्यापिका सिंथिया फर्नांडीस, व्यवस्थापन कमिटी सदस्य सिस्टर फिलोमीना डिसोझा, सिस्टर निर्मला चैत्तीहार, निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, उपशिक्षणाधिकारी अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिसांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हा परिषद शिक्षण विभागाची लाडोबा ठरलेल्या होलिक्रॉस इंग्लिश स्कूलच्या मनमानीला अखेर न्यायालयाच्या आदेशानेच चाप बसणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे या शाळेच्या मुख्याध्यापिका सिंथिया फर्नांडीस, व्यवस्थापन कमिटी सदस्य सिस्टर फिलोमीना डिसोझा, सिस्टर निर्मला चैत्तीहार, निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, उपशिक्षणाधिकारी अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खोटी माहिती पुढे करून विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा दणका दिला आहे.

२९ मे ते २ जून २०२३ दरम्यान हा प्रकार घडला होता. या प्रकरणात शाहेद समदानी काझी (रा. गवळीपुरा, छावणी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलीला सहावीसाठी होलिक्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. २९ मे २०२३ रोजी त्यांनी अर्ज केला असता सहा दिवसांनी विद्यार्थिनीला चाचणी परीक्षेसाठी घेऊन यायला सांगण्यात आले. मॅनेजमेंटने मुलीची परीक्षा घेतली. मात्र लगेचच ती नापास झाल्याचे सांगून प्रवेश नाकारला. या मनमानीविरुद्ध काझी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मात्र शिक्षण विभागाची खासगी शाळांप्रती असलेली बोटचेपी भूमिका इथे आड आली. त्‍यामुळे काझी यांना न्याय मिळाला नाही. अखेर काझी यांनी न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणात आता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्‍यावरून क्रांती चौक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत. या शाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी या प्रकरणात २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता हे विशेष. मुख्याध्यापिका सिंथीया फर्नांडिस यांनी काझी यांच्या तक्रारीवर सहावी वर्गासाठी ३०३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. आता जागा शिल्लक नाहीत, असा अहवाल सादर जिल्हा परिषदेच्या सीईओंना सादर केला होता. मात्र काझी यांनी शाळेतील पटसंख्येबाबत अधिकृत माहिती मिळविली असता त्यात २९७ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिल्याचे समोर आले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software