- News
- सिटी क्राईम
- मोठी बातमी : सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने बदलापूरहून गाठले छ. संभाजीनगर!; पोल...
मोठी बातमी : सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने बदलापूरहून गाठले छ. संभाजीनगर!; पोलीस २४ तास आले अलर्ट मोडवर… बाबा चौकात मुलीला सुरक्षित पाहून पोलिसांच्या जिवात जीव!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने घर सोडले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (ता. अंबरनाथ) येथून ती रेल्वे छत्रपती संभाजीनगरला आली. तिकडे तिच्या आईने पोलिसांत धाव घेऊन मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. बदलापूर पोलिसांनी युद्धपातळीवर मुलीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासात ती छत्रपती संभाजीनगरच्या महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) परिसरात असल्याचे समोर आले. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने घर सोडले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (ता. अंबरनाथ) येथून ती रेल्वे छत्रपती संभाजीनगरला आली. तिकडे तिच्या आईने पोलिसांत धाव घेऊन मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. बदलापूर पोलिसांनी युद्धपातळीवर मुलीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासात ती छत्रपती संभाजीनगरच्या महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना संपर्क करण्यात येऊन दामिनी पथकाला मुलीच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. दामिनी पथकाने फोटोवरून महावीर चौकात मुलीचा शोध घेतला. ती एका ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेत बसलेली दिसली. पोलिसांनी स्वतःची ओळख करून देत तिला दिलासा दिला. विश्वासात घेतल्यावर तिने घर सोडण्याचे कारण सांगितले. तिची आई रात्रीच छ. संभाजीनगरला येण्यास निघाली…
निशा रेल्वेने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोनला शहरात आली. दिवसभर रेल्वेस्थानकात बसून राहिली. शनिवार सायंकाळी रेल्वेस्थानकाबाहेर आली. तिने सायंकाळी मोबाइल सुरू करताच ती महावीर चौक परिसरात असल्याचे समोर आले. बदलापूर पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरच्या दामिनी पथकाला कळवले जाताच पोलीस अंमलदार निर्मला निभोरे, रुपाली शिंदे यांनी महावीर चौकात धाव घेऊन फोटोवरून तिचा शोध सुरू केला. एका कोपऱ्यात निशा घाबरलेली बसलेली होती. तिला सुरक्षित पाहून पोलिसांच्या जिवात जीव आला. त्यांनी तिच्याकडे येत स्वतःची ओळख दिली. विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तिच्या आईला मुलगी सुरक्षित असल्याचे कळविण्यात आले. तिची आई रात्रीच छत्रपती संभाजीनगरकडे निघाली. पोलिसांनी निशाच्या जेवण, राहण्याची व्यवस्था केली.

