मोठी बातमी : रेल्वेच्या मोठ्या घातपाताचा कट छ. संभाजीनगरात उघडकीस, नंदीग्राम एक्स्प्रेसच्या चालकाने आपात्कालीन ब्रेक लावल्याने टळली दुर्घटना, रेल्वेचे नुकसान झाले, पण शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरजवळील लाडगाव-करमाडजवळील रेल्वेपटरीवर सिमेंटचे मोठे ढापे ठेवून रेल्वेचा मोठा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्‍न झाल्याचा धक्कादायक कट समोर आला आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसच्या चालकाच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्‍याने आपात्कालीन ब्रेक लावले, तरीही रेल्वे धडकलीच. यात रेल्वेचे मोठे नुकसान झाले. मात्र शेकडो प्रवाशांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत. […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरजवळील लाडगाव-करमाडजवळील रेल्वेपटरीवर सिमेंटचे मोठे ढापे ठेवून रेल्वेचा मोठा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्‍न झाल्याचा धक्कादायक कट समोर आला आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसच्या चालकाच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्‍याने आपात्कालीन ब्रेक लावले, तरीही रेल्वे धडकलीच. यात रेल्वेचे मोठे नुकसान झाले. मात्र शेकडो प्रवाशांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत. ही खळबळजनक घटना आज, २३ सप्टेंबरला पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) घडली.

या प्रकरणात दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता कैलास भुवनेश्वर दास (वय ४८, रा. अमृत साईप्लाझा अपार्टमेंट छत्रपती संभाजीनगर ) यांनी करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्याकडे रेल्वेपटरीची दुरुस्ती व देखरेख करण्याची जबाबदारी आहे. तसेच रात्रीच्या वेळेला पेट्रोलिंग नेमून देखरेख ठेवण्याचीही जबाबदारी आहे. आज पहाटे एकला (मध्यरात्री) नांदेड रेल्वे कंट्रोल रूममधून कॉल आला व त्यांना कळविण्यात आले की, लाडगाव- करमाड शिवारात असलेल्या रेल्वे पटरीवर कोणीतरी सिमेंट काँक्रिटचे मोठ्या आकाराचे ढापे टाकले आहेत. जेणेकरून रेल्वे ही पटरीवरून उतरून अपघात होईल.

नंदीग्राम एक्स्प्रेस ही छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याकडे जात असताना ही रेल्वेचालकाच्या लक्षात आली. त्याने अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन ब्रेकचा वापर करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करूनही रेल्वेचे ब्रेक लावूनही गाडी रेल्वे पटरीवर ठेवलेल्या मोठ्या सिमेंटच्या ढाप्यांना जाऊन आदळली. त्यामुळे रेल्वे पटरीचे तसेच रेल्वे इंजिनचे कॅटलगार्डचे नुकसान झाले आहे. ही बाब कळताच दास यांनी तातडीने वरिष्ठांना कळवून तात्काळ अधिकारी व कर्मचारी अंकुरकुमार अरुणकुमार सिंह, कुंदनकुमार नरेशप्रसाद रज्जाक, सुभेंदूमंडल सुकुमार मंडल व रेल्वे सुरक्षा बलाचे परमवीर सिंह विनयसिंह, शिवहारी कारभारी सानप यांना घेऊन घटनास्थळ गाठले.

रेल्वेपटरीवर मध्यभागी सिमेंट काँक्रिटचे ढापे अस्ताव्यस्त तुटफूट होऊन १०० मीटरपर्यंत विखुरलेले दिसले. केबल मार्करही पटरीच्या बाजूला तुटफूट होऊन पडलेला दिसला. या धडकेमुळे व लावलेल्या ढाप्यामुळे पटरीला लावलेल्या १५ ते २० ईआरसी क्लीप व लाईनर रेल्वे पटरीपासून वेगळे होऊन पडलेले होते. कोणीतरी अज्ञात लोकांनी पटरीवरून रेल्वे घसरून अपघात होऊन रेल्वेमधील लोकांचा मृत्‍यू घडविण्याच्या दृष्टीने हे कृत्‍य केल्याचे समोर आले. करमाड पोलिसांनी कटकारस्थान रचणाऱ्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत निकाळजे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software