मोठी बातमी : एसबीओए शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता शित्रेसह अख्ख्या मॅनेजमेंटविरुद्ध गुन्हा दाखल, मनमानी करून ६७ विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याने शिक्षण विभागाचा दणका

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एक दोन नव्हे तर तब्‍बल ६७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या एसबीओए (SBOA) शाळेला शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला असून, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता शित्रे हिच्‍यासह व्यवस्थापनाविरुद्ध मंगळवारी (१० सप्‍टेंबर) सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. हडको एन ११ मध्ये ही वादग्रस्त शाळा असून, कायम वादात सापडलेली असते. पालक, विद्यार्थ्यांच्या तक्रारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एक दोन नव्हे तर तब्‍बल ६७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या एसबीओए (SBOA) शाळेला शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला असून, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता शित्रे हिच्‍यासह व्यवस्थापनाविरुद्ध मंगळवारी (१० सप्‍टेंबर) सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. हडको एन ११ मध्ये ही वादग्रस्त शाळा असून, कायम वादात सापडलेली असते. पालक, विद्यार्थ्यांच्या तक्रारी सुरू असतात. अखेर शिक्षण विभागाने थेट गुन्हे दाखल केल्याने अशापद्धतीने मनमानी करणाऱ्या अन्य खासगी शाळांच्या व्यवस्थापनांनाही धडकी भरली आहे.

या प्रकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक सचिन शिंदे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, शाळांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्‍के प्रवेश हे आरटीई (बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत होतात. २६ ऑगस्टला बालाजी भोसले व २९ पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, की आरटीई पोर्टलवरून आमच्या एकूण ६७ मुलांचा प्रवेश एसबीओए शाळेत निश्चित झाला असून, आम्‍ही प्रत्‍यक्ष प्रवेश घेण्यासाठी गेलो असता आमच्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्‍यामुळे शिक्षण विभागाने तातडीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला बोलावून घेतले. मात्र तिने स्वतःला न येता प्रतिनिधी पाठवली. न्यायालयात आमची याचिका प्रलंबित असल्याचे सांगून मुख्याध्यापिकेने शिक्षण विभागाच्या पत्रांना, आदेशाला केराची टोपली दाखवली. आजपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने एकूण ६७ विद्यार्थ्यांचे या शाळेचे नुकसान केले. त्‍यामुळे शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलत थेट या शाळेची मुख्याध्यापिका सुनिता शित्रे हिच्यासह शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software