मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर तिच्याच घरात घेतला गळफास!; रांजणगाव शेणपुंजीतील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर मध्यरात्रीदरम्‍यान झोपेतून उठून तिच्याच घरात ४१ वर्षीय व्यक्‍तीने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत शुक्रवारी (२८ जून) पहाटे समोर आली. श्रीराम झुलन कुशवाह भगत (वय ४१, रा. बजाजनगर) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून, रोजगाराच्या शोधात काही वर्षांपूर्वी वाळूज एमआयडीसीत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर मध्यरात्रीदरम्‍यान झोपेतून उठून तिच्याच घरात ४१ वर्षीय व्यक्‍तीने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत शुक्रवारी (२८ जून) पहाटे समोर आली.

श्रीराम झुलन कुशवाह भगत (वय ४१, रा. बजाजनगर) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून, रोजगाराच्या शोधात काही वर्षांपूर्वी वाळूज एमआयडीसीत आला. रोजगार मिळाल्यानंतर पत्नी व मुलांनाही त्याने गावाकडून बजाजनगरात राहायला आणले. ९ महिन्यांपूर्वी श्रीरामने उत्तर प्रदेशातील पतीपासून विभक्त राहणारी त्याची मैत्रीण दीपिका (नाव बदलले आहे) हिलाही कामाला लावतो म्हणून वाळूज एमआयडीसीत बोलावून घेतले होते.

ती चार मुलांना घेऊन आल्यानंतर त्याने तिला १५ दिवस आपल्याच घरी ठेवले. नंतर एका कंपनीत कामाला लावून देत रांजणगाव शेणपुंजीत तिला खोलीही भाड्याने घेऊन दिली. तो तिला स्वतः कंपनीत नेऊन सोडायचा, घरी घेऊन यायचा. गुरुवारी (२७ जून) रात्री तो दीपिकाच्या खोलीवर गेला. दोघांनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला.

या वादानंतर संध्या मुलांसह झोपी गेली. मध्यरात्रीच्या सुमारास तिला जाग आली असता श्रीरामने लोखंडी पाइपला गळफास घेतल्याचे तिला दिसून आले. त्यामुळे दीपिकाने मुलांना झोपेतून उठवत श्रीराम याच्या गळ्यातील गळफास काढून त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. माहिती मिळताच श्रीरामचा पुतण्या वकीलकुमार भगत याने रांजणगाव शेणपुंजीला धाव घेऊन श्रीरामला खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक इंगोले तपास करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software