‘मी ॲन्ड मम्मी’ हॉस्पिटलच्या गल्ल्यात जमा झालेले साडेदहा लाख रुपये घरी घेऊन जाताना डॉक्‍टरांच्या ‘पप्पांना’ लुटले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांत लुटमारीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. आणखी एका घटनेत थोडेथोडके नव्हेतर तब्‍बल साडेदहा लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. बीड बायपास रोडवरील रेणुकामाता कमानीजवळील मी ॲन्ड मम्मी हॉस्पिटलमध्ये जमा झालेल्या साडेदहा लाख रुपयांचा गल्ला घरी घेऊन जाताना डॉक्‍टरांच्या पप्पाला लुटण्यात आले. ही घटना सातारा परिसरातील […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांत लुटमारीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. आणखी एका घटनेत थोडेथोडके नव्हेतर तब्‍बल साडेदहा लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. बीड बायपास रोडवरील रेणुकामाता कमानीजवळील मी ॲन्ड मम्मी हॉस्पिटलमध्ये जमा झालेल्या साडेदहा लाख रुपयांचा गल्ला घरी घेऊन जाताना डॉक्‍टरांच्या पप्पाला लुटण्यात आले. ही घटना सातारा परिसरातील चाटे स्‍कूलजवळ घडली. चोरट्यांनी वृद्धाच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून शुक्रवारी (२० डिसेंबर) सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ. योगेश शिंदे यांचे मी ॲन्‍ड मम्‍मी रुग्णालय बीड बायपास रोडवरील रेणुकामाता कमानीजवळ असून, त्‍यांचे दुसरे रुग्णालय जालन्यात आहे. योगेश यांचे वडील सखाराम दगडूजी शिंदे (वय ७२) रुग्णालयात जमा झालेली रोख रक्कम रोज सायंकाळी घरी घेऊन जातात. १२ डिसेंबरला सायंकाळी त्यांनी रुग्णालयात जमा झालेले १० लाख ५० हजार रुपये बॅगेत भरले आणि दुचाकीवरून घरी निघाले. चाटे स्कूलजवळील घराच्या अंगणात अचानक दोघांनी त्‍यांच्यावर झडप घातली.

सखाराम शिंदे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून चोरटे पळून गेले. सखाराम शिंदे यांनी सातारा पोलिसांना कळवले. मात्र आठ दिवसांनी घटनेची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे अधिक तपास आहेत. चोरट्यांचे वय २५ ते ३० असावे, असा अंदाज आहे. त्‍यांना सखाराम शिंदे यांचा नित्‍यक्रम माहीत असावा. त्‍यांच्यावर पाळत ठेवून ही लूट झाल्याची शक्‍यता आहे. दोन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरण हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र त्‍यातून काही निष्पन्न झाले नाही. अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software