मागून धडक देत सुसाट ट्रक पसार, दुचाकीस्वार गंभीर जखमी, घाटीजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली आणि पसार झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्‍याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १३ मार्चच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. सिटी चौक पोलिसांनी आज, २० मार्चला त्‍याचा जबाब नोंदवून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्‍याचा शोध घेतला जात आहे. राहुल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली आणि पसार झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्‍याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १३ मार्चच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. सिटी चौक पोलिसांनी आज, २० मार्चला त्‍याचा जबाब नोंदवून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्‍याचा शोध घेतला जात आहे.

राहुल रमेश बचके (वय ३९, रा. गल्ली नं. ३ भीमनगर भावसिंगपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर सध्या मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. श्रीराम चिट्स प्रा. लि. या कंपनीत काम करतात. १३ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास टीव्ही सेंटर येथून भावसिंगपुऱ्याकडे दुचाकीने जात होते. जुब्लीपार्क सिग्नलवरून घाटीकडे वळत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्‍यांना धडक दिली. त्‍यामुळे बचके हे गंभीर जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले. त्‍यांचा मावसभाऊ सचिन संपत रगडे यांनी त्‍यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्‍यांना अधिक उपचारासाठी मेडीकव्हर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. त्‍यामुळे पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पंडीत वाघ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software