- News
- सिटी क्राईम
- महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांची एमजीएम रुग्णालयात तोडफोड!
महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांची एमजीएम रुग्णालयात तोडफोड!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : काही दिवसांपूर्वी अव्वाच्या सव्वा बिल लावण्यावरून वादात सापडलेल्या एमजीएम रुग्णालयात आता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील आयसीयूत तोडफोड केली. ही घटना शनिवारी (५ जुलै) दुपारी घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. राबियाबी कुरेशी (वय ५१, रा. जालना) असे मृत्यू झालेल्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : काही दिवसांपूर्वी अव्वाच्या सव्वा बिल लावण्यावरून वादात सापडलेल्या एमजीएम रुग्णालयात आता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील आयसीयूत तोडफोड केली. ही घटना शनिवारी (५ जुलै) दुपारी घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
राबियाबींच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर नातेवाइकांनी हलगर्जीपणाचे आरोप केले. त्यांना व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने संताप वाढत गेला आणि त्यांनी खिडक्यांच्या काचा व रुग्णालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. नातेवाइकांचा आक्रमकपणा पाहून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात वृत्त लिहीपर्यंत पोलिसांत ना एमजीएमकडून नातेवाइकांविरुद्ध तक्रार होती, ना नातेवाइकांनी एमजीएमची तक्रार केली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

