मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : डॉ. ज्ञानेश्वर भुबेंची दुचाकी चौघांनी जाळली, गोंधळ घालत सोसायटीत आले, दुचाकी उचलून शेंद्रा MIDC चौकात आणली अन्‌ आग लावून दिली!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले डॉ. ज्ञानेश्वर भुंबे हे राहत असलेल्या सोसायटीत चौघे घुसले. डॉ. भुंबे घरी नव्हते. चौघांनी त्‍यांची दुचाकी सोसायटीतून उचलून चौकात आणली आणि आग लावून पेटवून दिली. काही वेळातच दुचाकी खाक झाली. ही थरारक घटना कुंभेफळ (ता. छत्रपती संभाजीनगर) […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले डॉ. ज्ञानेश्वर भुंबे हे राहत असलेल्या सोसायटीत चौघे घुसले. डॉ. भुंबे घरी नव्हते. चौघांनी त्‍यांची दुचाकी सोसायटीतून उचलून चौकात आणली आणि आग लावून पेटवून दिली. काही वेळातच दुचाकी खाक झाली. ही थरारक घटना कुंभेफळ (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात कुंभेफळ पार्क सोसायटीचे चेअरमन बजरंग वाळुंज यांनी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी परमेश्वर देविदास शेळके, संतोष दादाराव गोजे, विलास अर्जुन शेळके, संजय नागोराव गोजे (सर्व रा. कुंभेफळ) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. भुंबे यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस व्हॉट्‌स ॲपला ठेवले होते. ते पाहिल्यानंतर शेलूद येथील गोविंद गणपतराव नरवडे यांनी करमाड पोलीस ठाण्यात भुंबे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच परमेश्वर शेळकेंसह चौघांनी डॉ. भुंबे राहत असलेल्या सोसायटीत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली.

मोठमोठ्याने आरडाओरड करत डॉ. भुंबेंबद्दल विचारणा केली. त्‍यांची पार्किंगमध्ये लावलेली बजाज डिस्‍कवर गाडी घेऊन जाऊ लागले. सोसायटी चेअरमन या नात्‍याने वाळुंज यांनी त्‍यांना रोखण्याचा प्रयत्‍न केला. मात्र चौघांची आक्रमकता पाहून ते मागे हटले. चौघांनी दुचाकी उचलून शेंद्रा एमआयडीसीच्या चौकात आणली आणि दुचाकी पेटवून दिली. डॉ. भुंबे यांनी जरांगे यांच्याबद्दल अपशब्‍द वापरल्याने चौघांनी त्‍यांची दुचाकी पेटवून दिल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software