मनी लाँड्रिंग केसमध्ये नाव गोवण्याची धमकी देत महिलेसह वृद्धाला तब्‍बल १८ लाखांचा गंडा!, बीड बायपास भागातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीगनर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनी लाँड्रिंग केसमध्ये नाव गोवण्याची धमकी देत एका वृद्धाला व एका महिलेला तोतया अधिकाऱ्यांनी तब्‍बल साडेअठरा लाखांनी गंडा घातला. या प्रकरणात वृद्ध आणि महिलेने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५८ वर्षीरू सेवानिवृत्त व्यक्‍ती अरुणोदय कॉलनीत राहतात. त्‍यांनी दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की २५ जूनला ते […]

छत्रपती संभाजीगनर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनी लाँड्रिंग केसमध्ये नाव गोवण्याची धमकी देत एका वृद्धाला व एका महिलेला तोतया अधिकाऱ्यांनी तब्‍बल साडेअठरा लाखांनी गंडा घातला. या प्रकरणात वृद्ध आणि महिलेने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

५८ वर्षीरू सेवानिवृत्त व्यक्‍ती अरुणोदय कॉलनीत राहतात. त्‍यांनी दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की २५ जूनला ते दत्तमंदिर, देवळाई चौक, बीडबायपास येथे असताना त्‍यांच्या मोबाइलवर कॉल आला. तुमचे इंग्लंड येथून दिल्लीत पार्सल आलेले आहे. यासाठी तुम्हाला २९ हजार ५०० रुपये भरावे लागतील असे समोरच्या सायबर भामट्याने सांगितले. त्‍यामुळे वृद्धाने त्‍यांच्या बँक खात्‍यातून सायबर भामट्याला पैसे पाठवले. त्‍यानंतर पुन्हा १ लाख रुपये भरले. त्‍यानंतर सायबर भामट्यांनी सांगितले, की या पार्सलमध्ये ७५ हजार पौंड निघाले आहेत, असे म्‍हणत भामट्याने ९९ हजार रुपये, नंतर २ लाख ५५ हजार व नंतर ७ लाख ८३ हजार ३०० रुपये मागितले. पण वृद्धाने हे पैसे दिले नाहीत.

त्‍यानंतर तुमच्या खात्‍यात ३ कोटी ७८ लाख रुपये आलेले आहेत. त्यासाठी पौंडमधून रुपयांत कन्व्हर्ट करण्यासाठी पैसे लागतात. त्यानंतर RBI चे चार्ज लागतात.. असे वेगवेगळे कारणे सांगून पैसे पाठवा असे व्हॉटस ॲपवर त्‍यांनी मेसेज सुरू केले. २१ जुलै २०२४ रोजी डिप्लोमॅटीक अधिकारी भारतात येणार आहेत. तुमचे पत्त्यावर तुम्हाला ३ कोटी ७८ लाख रुपये देणार आहेत. तुम्ही तात्काळ उ‌द्याच २२ लाख रुपये पाठवा. नाहीतर डिप्लोमॅटीक अधिकाऱ्याचा अपमान म्हणून तुम्हाला अटक करावी लागेल. अशा धमक्या सुरू झाल्या. तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगची केस होईल. त्यात तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल. समाजात तुमची प्रतिमा खराब होईल, असेही धमकावले जाऊ लागले. आपण विनाकारण जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्‍यामुळे वृद्धाने सातारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी करत आहेत.
या नंबरवरून वृद्धाला आल्या धमक्या…
+44 7563523872
+44 7425461737
+44 7529494773
+44 7466441672
+44 7494838959

महिलेला वेगळीच धमकी, तुमचा आधार क्रमांक म्हणे सायबर गुन्ह्यात सापडला…
मनी लाँड्रिंग केसमध्ये नाव निष्पन्न झाल्याचे सांगून तोतया पोलिसांनी सुशिक्षित महिलेला तब्बल १० दिवस छळून १७ लाख ३१ हजार रुपये उकळले. महिलेला कुटुंबाने धीर दिल्यानंतर या प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. बी.एसस्सी उत्तीर्ण विवाहित महिला बीड बायपास परिसरात राहते. त्यांचे पती वाळूजच्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. १ मार्च रोजी सायंकाळी त्‍यांना सायबर भामट्याने कॉल करून तो ट्रायल डिपार्टमेंट नोटिफिकेशन युनिटमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार कार्ड क्रमांक एका सायबर गुन्ह्यात सापडल्याचे सांगून त्‍याने काही प्रश्न केले. त्यानंतर तोतया सीबीआय, आयपीएस अधिकारीही व्हिडीओ कॉलवर आले. अटक वॉरंट निघाल्याचे या महिलेला सांगण्यात आले. या प्रकरणात सातारा पोलिसांनी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software