- News
- सिटी क्राईम
- भिन्नधर्मीय तरुणीला लिफ्ट देणे युवकाला पडले महागात; जमावाने रस्त्यात अडवून केली मारहाण!; छत्रपती संभ...
भिन्नधर्मीय तरुणीला लिफ्ट देणे युवकाला पडले महागात; जमावाने रस्त्यात अडवून केली मारहाण!; छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भिन्नधर्मीय तरुणीला लिफ्ट देणे युवकाला महागात पडले. तिला सोडून तो परतत असताना जमावाने अडवून बेदम मारहाण केली. कपडेही फाडून टाकले. विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानात तैनात पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन युवकाची सुटका केली. नंतर सिटी चौक पोलिसांना कळवले. त्यांनी घटनास्थळी येऊन लाठीमार करून जमावाला पांगवले. ३० जणांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भिन्नधर्मीय तरुणीला लिफ्ट देणे युवकाला महागात पडले. तिला सोडून तो परतत असताना जमावाने अडवून बेदम मारहाण केली. कपडेही फाडून टाकले. विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानात तैनात पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन युवकाची सुटका केली. नंतर सिटी चौक पोलिसांना कळवले. त्यांनी घटनास्थळी येऊन लाठीमार करून जमावाला पांगवले. ३० जणांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानासमोर घडली.
नितीन फकीरराव पाटील (वय ३१, रा. हिवरखेडा, ता. कन्नड, ह. मु. हरसिद्धीनगर, हर्सूल) हा एचडीएफसी बँकेत काम करताे. रोजाबाग येथील शाखेत असताना त्याच्याकडे एक तरुणी आली. तिला बँकेतील खाते बंद करायचे होते. मात्र या शाखेतील बँक खाते बंद करण्याचे फॉर्म संपले होते. त्यानंतर त्या तरुणीने नितीनला टीव्ही सेंटरपर्यंत लिफ्ट देण्याची विनंती केली. नितीनने तिला टीव्ही सेंटरला नेऊन सोडत परत बँकेकडे निघाला असता विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानासमोर काही तरुणांनी त्याला अडवले आणि शिवीगाळ सुरू केली. काही वेळातच तिथे जमाव जमला. सर्वांनी मिळून नितीनला मारहाण सुरू केली. जवळच्या झाडाच्या फांद्या तोडून आणून नितीनला झोडपले. कपडेही फाडून टाकले.
विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात तैनात पोलिसांना हा प्रकार दिसताच त्यांनी धाव घेऊन नितीनची सुटका केली आणि नियंत्रण कक्षाला कॉल केला. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरीही जमाव निघून जात नव्हता. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. नितीनला घाटी रुग्णालयात नेऊन उपचार करवल्यानंतर सिटी चौक पोलिसांत त्याने तक्रार दिली. त्यावरून ३० जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लेबर कॉलनीच्या मैदानावर भिन्नधर्मीय मुलीसोबत बोलणाऱ्या तरुणाला याच परिसरातील तरुणांनी मारहाण केली होती, हे विशेष.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

