- News
- सिटी क्राईम
- Update : भवानीनगरात नशेखोरांचा राडा; दगडफेक, नक्की काय घडलं, STORY ON THE SPOT
Update : भवानीनगरात नशेखोरांचा राडा; दगडफेक, नक्की काय घडलं, STORY ON THE SPOT
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रविवारी रात्री जुना मोंढा परिसरातील भवानीनगरमध्ये नशेखोरांनी केलेल्या राड्यामुळे शहरात अफवांचे पेव फुटले होते. नशेखोरांनी एका युवकाला घरात घुसून मारहाण करत त्याच्या घरावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दंगा काबू पथक तैनात करण्यात आले. आज सकाळपर्यंत वातावरण निवळले असून, परिसरात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रविवारी रात्री जुना मोंढा परिसरातील भवानीनगरमध्ये नशेखोरांनी केलेल्या राड्यामुळे शहरात अफवांचे पेव फुटले होते. नशेखोरांनी एका युवकाला घरात घुसून मारहाण करत त्याच्या घरावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दंगा काबू पथक तैनात करण्यात आले. आज सकाळपर्यंत वातावरण निवळले असून, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. अशोक थोरात यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल केला आहे. आठ जणांची नावे त्यांनी दिली आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही लोक होते. त्यांची नावे समोर येत आहेत. त्यापैकी चौघांना अटकही केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली.
अशोक मारोतीराव थोरात (वय ३७, रा. जुना मोंढा भवानीनगर, शिवसेना पाटीजवळ) यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते कुरिअर ऑफिसमध्ये कामाला आहेत. त्यांच्या घरामागे समीर शेख, रिहान, सोफीयान, आदर्श सुनके, कृष्णा गौरया व त्याचे इतर मित्र असे रोज सायंकाळी नशा करून त्यांच्या घरासमोर येऊन गप्पा मारत बसतात. अनेक वेळा त्यांना सांगूनसुध्दा ते ऐकत नाहीत. रविवारी (१३ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास ते घराबाहेर उभे असताना समीर शेख, सोफीयान शेख, आदर्श सुनके, कृष्णा गौरया आणि इतर घरासमोर रोडच्या पलीकडे उभे राहून थोरात यांच्यावर व घरावर लेझर लाईट चमकवत होते. त्यावरून थोरात यांनी त्यांना विचारणा केली, की तुम्ही लेझर लाईट का चमकावता? त्यामुळे ते सर्वजण तेथून पळून गेले. त्यानंतर काही वेळातच समीर शेख, रिहान शेख, सोफीयान शेख, आदर्श सुनके, कृष्णा गौरया, सबिया, शन्नू, बानु व त्यांच्यासोबत इतर आठ ते दहा पुरुष असे सर्वजण थोरात यांच्या घरासमोर शिवीगाळ करत आले व त्यांच्या घरात घुसले.
दोन गटांत दगडफेक सुरू असल्याची आणि तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच अवघ्या २० मिनिटांत पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नवनीत काँवत, प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, रणजित पाटील, सुदर्शन पाटील, मनोज पगारे, संपत शिंदे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, संभाजी पवार, संदीप गुरमे, अतुल येरमे, सुनील माने यांच्यासह शेकडो पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धाव घेतली. दंगाकाबू पथकालाही पाचारण केले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. टवाळखोरांची धरपकड सुरू करण्यात आली. ४ जणांना पहाटेपर्यंत ताब्यात घेतले होते. थोरात यांच्या तक्रारीतून ८ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. आणखी काही लोक आहेत, त्यांचीही ओळख पटविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. हा एका मोहल्ल्याचा वाद असून, सोशल मीडियावर कुणीही अफवा पसरवू नये. नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

