भयंकर… दूध घेऊन परतणाऱ्या महिलेचे तोंड दाबून ओढत पडक्‍या इमारतीत नेऊन पाशवी बलात्‍कार!, छ. संभाजीनगर हादरले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुकानातून दूध घेऊन घरी परतणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे तोंड दाबून बाजूच्याच पडक्‍या इमारतीत नेत २३ वर्षीय तरुणाने पाशवी बलात्‍कार केल्याच्या घटनेने शहर हादरले आहे. ही घटना रविवारी (३० जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास चिकलठाणा परिसरात घडली. शेख जाकीर ऊर्फ बाबा पिताशय गफार (वय २३, रा. हिनानगर, चिकलठाणा) असे नराधमाचे नाव असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुकानातून दूध घेऊन घरी परतणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे तोंड दाबून बाजूच्याच पडक्‍या इमारतीत नेत २३ वर्षीय तरुणाने पाशवी बलात्‍कार केल्याच्या घटनेने शहर हादरले आहे. ही घटना रविवारी (३० जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास चिकलठाणा परिसरात घडली. शेख जाकीर ऊर्फ बाबा पिताशय गफार (वय २३, रा. हिनानगर, चिकलठाणा) असे नराधमाचे नाव असून, त्‍याला सोमवारी (१ जुलै) रात्री सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

पीडित महिला पती, दोन मुलांसह चिकलठाण्यात राहते. दूध आणण्यासाठी ती भर पावसात किराणा दुकानात गेली. दूध घेऊन परतत असताना मागून येत शेख जाकीरने एका हाताने तिचे तोंड दाबले, दुसऱ्या हाताने केस पकडून अर्धवट बांधकाम झालेल्या पडक्या इमारतीत ओढत नेले. रुमालाने तिचे तोंड बंद करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर पाशवी बलात्‍कार केला. त्‍याच्या मारहाणीत महिला जखमी झाली. जखमी अवस्थेतच ति सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोन पथके नराधमाच्या अटकेसाठी रवाना केली. रविवारी मध्यरात्रीपासून त्‍याचा शोध घेतला जात होता, सोमवारी रात्री तो मिळून आला. त्‍याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या वाढत्‍या लैंगिक अत्‍याचाराच्या घटनांनी चिंता व्यक्‍त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software