भयंकर… तुझ्या गरजा भागवण्यासाठी त्या मुलासोबत फिरते काय म्हणत तरुणीला उचलून नेण्याची धमकी!; तरुणाच्या मोबाइलमध्ये आढळले तिचे फोटो, क्‍लिप्स, दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्‍न

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिला, तरुणींसाठी छत्रपती संभाजीनगर शहर असुरक्षित बनत चालले आहे. रोडरोमिओंच्या उच्छादाने तरुणींनी एकटे बाहेर जायलाही भीती वाटेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे एकूण घटनांवरून दिसून येत आहे. आणखी २ घटनांची त्‍यात भर पडली आहे. शहागंजमध्ये एका २३ वर्षीय तरुणीला मोठ्या बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले. ओळखीच्या आंतरधर्मीय तरुणाशी बोलण्याच्या कारणावरून पाच […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिला, तरुणींसाठी छत्रपती संभाजीनगर शहर असुरक्षित बनत चालले आहे. रोडरोमिओंच्या उच्छादाने तरुणींनी एकटे बाहेर जायलाही भीती वाटेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे एकूण घटनांवरून दिसून येत आहे. आणखी २ घटनांची त्‍यात भर पडली आहे.

शहागंजमध्ये एका २३ वर्षीय तरुणीला मोठ्या बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले. ओळखीच्या आंतरधर्मीय तरुणाशी बोलण्याच्या कारणावरून पाच ते सहा तरुणांनी तिचा गुलमंडी ते शहागंज पाठलाग केला. अश्लील बोलून उचलून नेण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (६ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास शहागंज परिसरात घडली. तरुणीच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून माजिद अनिस अन्सारी (वय २५, रा. शहानूरवाडी) व इतर पाच ते सहा अनोळखी तरुणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीच्या तक्रारीनुसार ती गुलमंडी परिसरात ओळखीच्या मुलासोबत बोलत होती. त्यानंतर तर शहागंजकडे निघाली असता शहागंजजवळ तिला सर्वांनी अडवले. तिचा हात धरून शिवीगाळ केली. तुझ्या गरजा भागवण्यासाठी त्या मुलासोबत फिरते काय, तू आमच्या सोबत चल, तू जर आली नाही तर तुला उचलून घेऊन जाईल, तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी दिली. तिचा मोबाइल हिसकावून घेतला. घाबरलेल्या तरुणीने सिटी चौक पोलीस ठाणे गाठून माजिदसह त्‍याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने माजिदचा शोध सुरू केला. त्‍याला शनिवारी रात्रीच अटक करण्यात आली. त्‍याला न्यायालयात हजर केले असता ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. माजिदकडून पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून, त्‍यात तक्रारदार तरुणीचे फोटो, क्लिप व मेसेजेस आढळले. त्‍यामुळे माजिदचा नेमका हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

जवाहरनगर भागातील रहिवासी १७ वर्षीय मुलगी टायपिंग क्लासला जाते. संतोष खंदारे (वय २७) हा तरुण तिचा १६ जूनपासून पाठलाग करत होता. सुरुवातीला मुलीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र यामुळे त्‍याची हिंमत वाढत जाऊन त्‍याने ४ जुलै रोजी सायंकाळी साडेसातला मुलीला शिवाजीनगरातील जागृत हनुमान मंदिर परिसरातील तिच्या क्लासजवळ अडवले.

‘माझ्यासोबत चल, नसता बघ मी काय करेन’ अशी धमकी दिली. तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला. घाबरून मुलीने तिथून पळ काढत घरी येऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तिला घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी संतोषविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software