बोगस शाळेवाल्या बाळासाहेब भगनुरेचा आणखी एक प्रताप; कॉम्‍प्‍युटर इंजिनियर महिलेला नोकरीच्या आमिषाने ६ लाखांचा गंडा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चैतन्य शिक्षण संस्थेच्या नावाखाली श्री रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, मूर्तिजापूर, चिकलठाणा ही बोगस शाळा चालविणाऱ्या बाळासाहेब भगनुरेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्‍याने एका संगणक अभियंता महिलेला नोकरीच्या आमिषाने ६ लाखांना गंडा घातला आहे. महिलेच्या पतीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२३ ऑगस्ट) या प्रकरणात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चैतन्य शिक्षण संस्थेच्या नावाखाली श्री रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, मूर्तिजापूर, चिकलठाणा ही बोगस शाळा चालविणाऱ्या बाळासाहेब भगनुरेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्‍याने एका संगणक अभियंता महिलेला नोकरीच्या आमिषाने ६ लाखांना गंडा घातला आहे. महिलेच्या पतीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२३ ऑगस्ट) या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी बाळासाहेब भगनुरेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय शंकर सोनार (वय ४१, रा. न्यू हनुमानगर छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आर्किटेक्ट आहेत. त्यांची पत्नी सरीता (वय ३५) या बी. ई. कॉम्‍प्‍युटर आहेत. मावस भाऊ संदीप माळेकर (रा. भारतनगर मुकुंदवाडी) यांनी संजय सोनार यांना सांगितले, बाळासाहेब दिगंबर भगनुरे (रा. मूर्तिजापूर मुकुंदनगर) यांच्याशी त्यांची ओळख असून, त्यांची चैतन्य शिक्षण संस्था आहे. त्‍यांच्या शाळेत प्रयोगशाळा सहायक या पदाची जागा रिक्त असून त्या जागेवर वहिणीला आपण नोकरी लावून टाकू. सरिताला यांना नोकरीची आवश्यकता असल्याने संजय सोनार हे मावसभाऊ माळेकर यांच्यासोबत बाळासाहेब भगनुरेला भेटले. त्यावेळी तुमच्या पत्नीला मी नोकरीला लावून देतो. मात्र त्‍याबदल्यात मला १२ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी भगनुरे याने केली. त्‍यामुळे सोनार यांनी तडजोड करून ९ लाख रुपये नोकरीसाठी देण्याचे ठरवले.

संदीप यांच्या समक्ष १ लाख रुपये रोख बाळासाहेब भगनुरे याला दिले. त्याच दिवशी बाळासाहेबने सरीता यांना त्याच्या श्री रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, मूर्तिजापूर, चिकलठाणा येथे प्रयोग शाळा सहायक या पदावर नियुक्ती दिली. त्‍यानंतर बाळासाहेब भगनुरेच्या बँक खात्यात सोनार यांनी एकूण ६ लाख १० हजार रुपये भरले. त्‍यांची पत्नी सरिता नियमित शाळेवरही जात होत्या. पत्नी व स्वतः सोनार यांनी बाळासाहेब भगनुरेला पगाराबाबत विचारपूस केली असता त्याने वेतन मान्यतेसाठी वेळ लागणार आहे, असे सांगितले. त्‍यामुळे सरिता शाळेवर नियमितपणे काम करत राहिल्या. परंतु त्यांना पगार मिळाला नाही. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये रावसाहेब पाटील शाळेला सील लागल्याचे सोनार यांना दिसले.

भगनुरेकडे सोनार यांनी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. इतर लोकांकडून सोनार यांना कळले, की शाळा बोगस असून तिला मान्यता नाही. त्यांचे भाऊ पांडुरंग भगनुरे व प्रकाश भगनुरे यांनी लोकांकडून पैसे घेऊन त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केल्याचे समजले. सोनार यांनी दिलेले पैसे परत मागितले असता त्‍याने चेक दिला. तो चेक बाऊन्स झाला. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली व उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. परत पैसे मागण्यास आल्यास तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. अशाच प्रकारे भगनुरे याने गुरुनाम सिंग हरदतसिंग दिगवा (रा. विनायकनगर मुकुंदवाडी व इतर तीन लोकांचीही नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस अंमलदार सतीश जोगस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software