बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी परिसरात रुग्णालय बांधण्याचे कंत्राट घेऊन तिघांनी मेडिकलच्या विद्यार्थ्याची १ कोटी ७५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. काय करायचे ते कर, मी पोलिसांना मॅनेज केले आहे, अशी धमकी देत पैसे देण्यास नकारही देण्यात आला. सातारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अमोल पवार, बाळासाहेब पवार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी परिसरात रुग्णालय बांधण्याचे कंत्राट घेऊन तिघांनी मेडिकलच्या विद्यार्थ्याची १ कोटी ७५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. काय करायचे ते कर, मी पोलिसांना मॅनेज केले आहे, अशी धमकी देत पैसे देण्यास नकारही देण्यात आला. सातारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अमोल पवार, बाळासाहेब पवार व तेजस्वी पवार या तिघांविरुद्ध आकाश गणेश बाचकर (वय २७, रा. सातारा परिसर) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. वडगाव कोल्हाटी परिसरात त्‍याने रुग्णालयासाठी जमीन खरेदी केली होती. तिघा पवारांनी आकाशकडून रुग्णालय बांधकामाचे कंत्राट घेतले. तसा करारनामाही आकाश आणि पवारांमध्ये झाला. करारानुसार आकाश यांनी तिघा पवारांना १ कोटी ७५ लाख ५२ हजार रुपये दिले. ४ हजार ४०० चौरस फुटांच्या बांधकामात तळमजल्यासह चार मजले, लिफ्ट, आर्किटेक्टने दिलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम, इंटेरियर, आयसीयू, ऑपरेशन थिएटरसह रुग्णालयाला आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याचे करारात ठरले होते.

पैसे घेतल्यानंतर तिघा पवारांनी रुग्णालय बांधकाम सुरू केलेच नाही. उलट आकाश यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्‍यामुळे आकाश यांनी दिलेले पैसे परत मागितले. त्‍यासाठी नोटीस पाठवल्यानंतर पवारने धनादेश दिले. आकाश यांनी ते बँकेत वटण्यासाठी टाकले असता सहीच चुकीची असल्याने धनादेश वटले नाहीत. आकाश यांनी पैशांसाठी तगादा लावल्यावर पवारांनी धमकावणे सुरू केले. काय करायचे ते कर, मी मुद्दाम चुकीची सही केली, माझे कोणी काही करत नाही, मी पोलिसांनाच मॅनेज करतो, असे पवारने धमकावल्याचे आकाशने तक्रारीत म्‍हटले आहे. जीवे मारण्याची धमकीही तिघा पवारांनी दिली. पोलिसांनीही वारंवार तिघा पवारांना चौकशीसाठी बोलावले असता ते आले नाहीत. त्‍यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software