बस एवढंच राहिलं होतं आता चोरांचं… बातमी वाचून डोक्‍याला हात लावाल!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरट्यांनी सध्या हैदोस घातला आहे. घरे, दुकाने, एटीएम सेंटर फोडून गेल्या आठच दिवसांत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकट्यादुकट्या व्यक्‍तीला लुटून नेण्याच्या घटना, मंगळसूत्र चोरीच्या घटनांनीही कळस केला आहे. अशातच अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुम्‍ही डोक्‍याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्‍सा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरट्यांनी सध्या हैदोस घातला आहे. घरे, दुकाने, एटीएम सेंटर फोडून गेल्या आठच दिवसांत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकट्यादुकट्या व्यक्‍तीला लुटून नेण्याच्या घटना, मंगळसूत्र चोरीच्या घटनांनीही कळस केला आहे. अशातच अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुम्‍ही डोक्‍याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्‍सा मशिदीजवळील वैशाली ढाब्‍याजवळ ही घटना घडली. चोरट्यांनी रविवारी (१ डिसेंबर) दुपारी घरासमोरील दोन बकऱ्या आणि बोकूड चोरून नेले.

शाहरुख अजमीर खान (वय ३०, रा. अक्‍सा मशिदीजवळ) यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते मिस्तरी काम करतात. त्‍यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या आणि एक बोकूड दोन वर्षांपासून आहे. रविवारी सकाळी ११ ला त्‍यांनी बकऱ्या आणि बोकूड घरासमोर चारा टाकून बांधलेल्या होत्‍या. दुपारी पाऊणला ते परतले असता बोकूड आणि बकऱ्या जागेवर नव्हत्या. कोणीतरी चोरून नेल्या. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नासेर शेख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software