बजाजनगरात हवेत गोळीबार!; नागरिकांची भीतीने उडाली गाळण…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात दुचाकीवरून आलेल्या मद्यधुंद तिघांनी दंगामस्ती करत थेट बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याची थरारक घटना शुक्रवारी (५ जुलै) रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोळीबार केल्यानंतर तिघेही दुचाकीवरून निघून गेले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्‍थळी जाऊन पाहणी केली. त्‍यानंतर तिघांचा शोध सुरू केला आहे. करीनगर येथे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात दुचाकीवरून आलेल्या मद्यधुंद तिघांनी दंगामस्ती करत थेट बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याची थरारक घटना शुक्रवारी (५ जुलै) रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोळीबार केल्यानंतर तिघेही दुचाकीवरून निघून गेले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्‍थळी जाऊन पाहणी केली. त्‍यानंतर तिघांचा शोध सुरू केला आहे.

करीनगर येथे गजबजलेल्या एका खासगी रुग्णालयासमोर हा प्रकार घडला. प्रत्‍यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले, की दुचाकीवर तिघे आले. ते नशेत होते. त्यांनी दंगामस्ती सुरू केली. रुग्णालयासह दुकाने या ठिकाणी असल्याने गर्दीही होती. तिघांपैकी एकाने काही कळायच्या आत रायफलसदृश बंदुकीने हवेत गोळीबार केला. यामुळे मोठा आवाज झाला. परिसरात गोंधळ उडाला. नागरिक भयभीत झाले.

सुदैवाने गोळीबारात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. या प्रकाराची माहिती नागरिकांकडून मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघेही दुचाकीवरून पसार झाले होते. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्‍थळी पाहणी केली. तिघांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software