फॉलोअप स्टोरी : चारित्र्यावर संशय, शहरात राहण्याचा हट्ट अन्‌ नांदायला येण्यास नकार देणाऱ्या पत्‍नीची हत्‍या, पतीला १२ तासांत अटक, छ. संभाजीनगरची थरारक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय आणि त्‍यातच नांदायला येण्यास नकार देणाऱ्या २४ वर्षीय पत्‍नीची चक्राकार दात्र्या असलेल्या लोखंडी रॉडने डोक्‍यात वार करून हत्‍या करणाऱ्या विठ्ठल उत्तम वाघ (वय २६, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) याला सातारा पोलिसांनी हत्‍येच्या अवघ्या १२ तासांत अटक करण्यात यश मिळवले. घराला कुलूप लावून विठ्ठल बहिणीच्या कन्नड तालुक्यातील जामडी येथे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय आणि त्‍यातच नांदायला येण्यास नकार देणाऱ्या २४ वर्षीय पत्‍नीची चक्राकार दात्र्या असलेल्या लोखंडी रॉडने डोक्‍यात वार करून हत्‍या करणाऱ्या विठ्ठल उत्तम वाघ (वय २६, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) याला सातारा पोलिसांनी हत्‍येच्या अवघ्या १२ तासांत अटक करण्यात यश मिळवले. घराला कुलूप लावून विठ्ठल बहिणीच्या कन्नड तालुक्यातील जामडी येथे लपून बसला होता. मोबाइल लोकेशनच्या साह्याने पोलिसांनी त्‍याला गाठले आणि मुसक्या आवळल्या. तो पुण्याला पळून जाणार होता. खून केल्याचा पश्चाताप नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

भारती विठ्ठल वाघ (वय २४) असे हत्‍या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. भारतीचा विवाह जानेवारी २०२४ मध्ये विठ्ठलसोबत झाला होता. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती-पत्नी कामानिमित्त शहरात येऊन सातारा परिसरात राहत होते. विठ्ठलला भारतीच्या चारित्र्यावर संशय होता. वाद वाढल्याने दोघे पुन्हा गावी बोधेगावला राहायला गेले होते. तिथे शहरात राहण्यासाठी भारतीचा हट्ट असल्याने दोघांत चारित्र्याच्या संशयावरून कायम वाद होत होता. तिला मूल नको होते, गर्भधारणा होऊ नये म्‍हणून गोळ्या खायची, असे विठ्ठलचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे भारतीचे वडील ८ डिसेंबरला तिला माहेरी घेऊन आले होते. सोमवारी सकाळी भारतीची आई रंजना व भाऊ राहुल आणि वहिनी कामानिमित्त बाहेर गेले होते. ११:३० वा. तिचे वडील बँकेत गेले.

तेव्हा घरी भारती व तिच्या भावाची चार वर्षांची मुलगीच होती. विठ्ठल वाद मिटवण्यासाठी पत्‍नीकडे आला. पुन्हा घरी चलण्याचा हट्ट केला. तिने येण्यास नकार दिल्याने दोघांत कडाक्‍याचे भांडण होऊन विठ्ठलने संतापाच्या भरात घरात असलेल्या चक्राकार दात्र्याच्या लोखंडी रॉडने भारतीच्या डोक्यात वार केले. भारती रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळताच तो पळून गेला. सातारा पोलीस ठाण्यात भारतीचे वडील राधाकिसन आसाराम गरबडे (रा. बजाज हॉस्पिटलसमोर, महूनगर) यांनी तक्रार दिली.

त्‍यावरून विठ्ठलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख यांचे पथक विठ्ठलच्या शोधात निघाले. हत्‍या केल्यानंतर विठ्ठलने एसटी बसने बोधेगाव गाठले. तिथे आई, वडील व भावाला घडलेली घटना सांगितली. पोलीस आपल्याला पकडायला येतील, असे म्हणत आई, वडील व भावाला सोबत घेऊन तो बहिणीकडे कन्‍नड तालुक्‍यातील जामडी येथे गेला. तिथून तो पुण्याला जाणार होता. मात्र त्‍याआधीच पोलिसांनी जामडी गाठले. विठ्ठल विजेचे खांब रोवण्याचे काम करतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software