प्लॉटिंग व्यावसायिकाची विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या; एका नेत्‍याच्या भावाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल…, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्लॉटिंग व्यावसायिक रवींद्र सुखदेव बनकर (वय ३६, रा. शिवाजीनगर) यांनी गांधेली शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे सोमवारी (१५ जुलै) सायंकाळी समोर आले. ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. कुटुंबाला त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट आढळली असून, त्यात एका नेत्याच्या भावाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्‍हटले […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्लॉटिंग व्यावसायिक रवींद्र सुखदेव बनकर (वय ३६, रा. शिवाजीनगर) यांनी गांधेली शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे सोमवारी (१५ जुलै) सायंकाळी समोर आले. ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. कुटुंबाला त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट आढळली असून, त्यात एका नेत्याच्या भावाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्‍हटले आहे.

चितेगाव परिसरात २०१२ मध्ये रवींद्र बनकर यांनी जमीन विकत घेतली होती. जवळ राहणाऱ्या एकाने या जमिनीवर अनधिकृत कब्जा केला होता. रवींद्र यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, एका स्थानिक नेत्याचे नातेवाईक असल्याने तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. ११ जुलैला रवींद्र कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर परतले नव्हते. १२ जुलैला ते बीड बायपास परिसरात शेवटचे दिसल्याचे समोर आले होते. कुटुंबाने चिकलठाणा पोलीस ठाण्यात १२ जुलैला ते बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

सोमवारी सायंकाळी गांधेली परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे, की ग्रामपंचायतीत रीतसर नोंद असतानादेखील कोणीही तक्रारीची दखल घेतली नाही. देवळाईच्या पटेल नामक मित्राकडे कागदपत्रे आहेत. मी माझे जीवन संपवत आहे. मी सगळ्यांकडे जाऊन थकलो, कोणीच मदत केली नाही. दरम्यान, चिकलठाणा पोलीस सुसाईड नोटची खातरजमा करत असून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software