प्रेमाच्या नावाखाली तरुणीचा उपभोग घेतल्यानंतर लग्नास नकार; तिने दुसरीकडे लग्न केल्यावर तिच्या पतीसोबत चॅटिंग करून दिली प्रेमाची माहिती!; वाळूज MIDC तील प्रकार, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉलेजमध्ये शिकताना मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, दोघे सोबत फिरू लागले. दोघांच्या घरच्यांनीही लग्‍नाला संमती दिली. त्‍याने लग्नाआधीच तिला प्रेमाच्या आणाभाका देत लॉजवर नेऊन शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली… नंतर लग्नाला नकार दिला. तिच्या घरच्यांनी नात्‍यातील तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. मात्र त्‍यानंतर त्‍याचे प्रेम उफाळून येऊन त्‍याने तिच्या पुनर्प्राप्तीसाठी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉलेजमध्ये शिकताना मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, दोघे सोबत फिरू लागले. दोघांच्या घरच्यांनीही लग्‍नाला संमती दिली. त्‍याने लग्नाआधीच तिला प्रेमाच्या आणाभाका देत लॉजवर नेऊन शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली… नंतर लग्नाला नकार दिला. तिच्या घरच्यांनी नात्‍यातील तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. मात्र त्‍यानंतर त्‍याचे प्रेम उफाळून येऊन त्‍याने तिच्या पुनर्प्राप्तीसाठी तिच्या पतीसोबत चॅटिंग करत दोघांतील लग्नाआधीच्या सर्व गोष्टी सांगितल्या… त्‍यामुळे पती-पत्‍नीत वाद होऊन तिच्या पतीने तिला माहेरी पाठवून दिले… तिने प्रियकराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्‍यावरून पोलिसांनी आदित्य अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे घटना…
२४ वर्षीय वर्षा (नाव बदलले आहे) वाळूज एमआयडीसी परिसरात राहते. वर्षभरापूर्वी इंजिनिअरिंगला असताना वर्षाची ओळख कॉलेजमध्येच शिकणाऱ्या आदित्यसोबत झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्री अन्‌ मैत्रीचे रुपांतर काही दिवसांतच प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. आई-वडिलांना घेऊन तो वर्षाच्या घरी आला. दोघांच्या घरच्यांनीही ही बाब सकारात्‍मकतेने घेत दोघांच्या लग्नाला सहमती दर्शवली.

दोघांना समजून घेण्यासाठी सहा महिन्यांचा अवधीही दिली. लग्नाला सहमती मिळाल्याने दाेघे बाहेर फिरायला जाऊ लागले. त्‍याने तिला पंढरपूरमधील एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर वारंवार तो तिच्यासोबत संबंध ठेवू लागला. तिने विरोध केला की लग्न तोडण्याची धमकी देत होता. नंतरच्या काळात त्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला. त्‍यामुळे तिच्या पालकांनी नात्यातील तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले.

तिचे लग्न झाल्यावर प्रेम उफाळून आलेल्या आदित्यने तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर चॅटिंग करत वर्षा आणि त्याच्याबद्दल सर्व काही सांगितले. तिच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळल्यावर हादरलेल्या वर्षाच्या पतीने तिला माहेरी पाठवून दिले. त्‍यानंतर वर्षाने आदित्यविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करत आहेत.

तरुणीचा पाठलाग करून अश्लील कृत्‍य
रोहित रवींद्र इंगळे (वय २५, रा. एन ७ सिडको) याने तरुणीला रस्त्यात अडवून अश्लील कृत्य केले. तिने विरोध केला असता तिच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी नऊला एन ७ अयोध्यानगर ते रोपळेकर रुग्णालयादरम्यान हा प्रकार घडला. रोहितविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software