पुन्हा हिट ॲन्‍ड रन…सुसाट कार दाम्‍पत्‍याला उडवून पसार, पतीचा मृत्‍यू, पत्‍नी जखमी, विद्यापीठ गेट समोरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दाम्‍पत्‍याला उडवून सुसाट कार पसार झाली. यात पतीचा मृत्‍यू झाला, तर पत्‍नी जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (४ नोव्‍हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास विद्यापीठ गेटसमोर घडली. दाम्‍पत्‍य जेवण झाल्यानंतर शतपावली करत असतानाच काळ ओढावला. एलिएजर जॉर्ज इंगल्स (वय ४३, रा. शांतीपुरा, नंदनवन कॉलनी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे, तर त्‍यांची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दाम्‍पत्‍याला उडवून सुसाट कार पसार झाली. यात पतीचा मृत्‍यू झाला, तर पत्‍नी जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (४ नोव्‍हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास विद्यापीठ गेटसमोर घडली. दाम्‍पत्‍य जेवण झाल्यानंतर शतपावली करत असतानाच काळ ओढावला.

एलिएजर जॉर्ज इंगल्स (वय ४३, रा. शांतीपुरा, नंदनवन कॉलनी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे, तर त्‍यांची पत्‍नी कांचन (वय ३८) जखमी झाल्या आहेत. एलिएजर हे एका कारच्या शोरूममध्ये सेल्स मॅनेजर होते. सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर कारने विद्यापीठ परिसरात आले. गेटसमोर कार उभी करून ते अजिंठा होस्टेलच्या दिशेने चालत होते.

मागून भरधाव आलेल्या कारचालकाने त्यांना उडवले. धडक इतकी भीषण होती, की ते काही क्षणांसाठी हवेत उडाले. त्‍यानंतर रस्त्यावर कोसळले. त्‍यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. जखमी कांचन यांनी रस्त्याने जाणारे वाहन थांबवून पतीला घाटी रुग्णालयात नेले. तिथून त्‍यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) पहाटे पाचच्या सुमारास त्‍यांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

ठाण्यांचा हद्दीचा वाद…
या प्रकरणात ठाण्यांच्या हद्दीच्या वादात नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. नातेवाइक तक्रार करण्यासाठी छावणी पोलीस ठाण्यात गेले असता त्‍यांना घटनास्थळ विचारून बेगमपुरा पोलीस ठाण्यात जायला सांगण्यात आले. बेगमपुरा पोलिसांनी पुन्हा छावणी पोलीस ठाण्यात पाठविले. त्‍यानंतर छावणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software