पिसादेवीच्या ग्रा. पं. सदस्याचा लाचखोर दीर शिवाजी पखे ACB च्या जाळ्यात!; BDO निघाले निष्कलंक…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गटविकास अधिकाऱ्यांकडून काम करून देण्याचे सांगून ५ हजार रुपये लाच मागणी करीत ४ हजार रुपये स्वीकारणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली. पिसादेवी येथे ही कारवाई करण्यात आली. शिवाजी रतन पखे (४८, रा. पिसादेवी) असे लाचखोराचे नाव असून, त्‍याच्याविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गटविकास अधिकाऱ्यांकडून काम करून देण्याचे सांगून ५ हजार रुपये लाच मागणी करीत ४ हजार रुपये स्वीकारणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली. पिसादेवी येथे ही कारवाई करण्यात आली. शिवाजी रतन पखे (४८, रा. पिसादेवी) असे लाचखोराचे नाव असून, त्‍याच्याविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी पत्रकारांना दिली.

शेतकऱ्याने शासकीय योजनेतून गाय गोठा मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांची फाइल मंजूर होत नव्हती. शिवाजी पखे याने शेतकऱ्याला गाठले. पंचायत समितीतून बीडीओकडून तुमची फाईल मंजूर करून देतो, अशी थाप मारत त्यासाठी पाच हजार रुपये मागितले. शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती ४ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे शिवाजीने मान्य केल्याचे निष्पन्न झाले. बीडीओंच्या नावाने लाच मागितल्यामुळे एसीबी पथकाने बीडीओ यांच्याकडेही लाच मागणीची पडताळणी केली.

मात्र, बीडीओंनी कायदेशीर बाबी असल्यास काम होईल, कोणत्याही खासगी व्यक्तीशी संपर्क साधण्याची गरज नाही, असे सुनावले होते. त्यामुळे या प्रकरणात बीडीओ यांचा संबंध येत नसल्याचे समोर आले. शिवाजी पखे हा परस्पर पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचून त्‍याला पिसादेवीत शेतकऱ्याकडून ४ हजार रुपये घेताना रंगेहात ताब्‍यात घेण्यात आले. अधिक तपास एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software