पत्नी घरी येत नाही म्हणून तिच्या आईचे घर जाळले!; छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी घरी येत नाही म्हणून पतीने तिच्या आईचे घर जाळून टाकल्याची खळबळजनक घटना १४ सप्टेंबरला रात्री घारेगाव एकतुनी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. करमाड पोलिसांनी जगदीश शिवराम पाटील (रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मीना जगदिश पाटील (वय २८, रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर) या विवाहितेने या प्रकरणात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी घरी येत नाही म्हणून पतीने तिच्या आईचे घर जाळून टाकल्याची खळबळजनक घटना १४ सप्टेंबरला रात्री घारेगाव एकतुनी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. करमाड पोलिसांनी जगदीश शिवराम पाटील (रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मीना जगदिश पाटील (वय २८, रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर) या विवाहितेने या प्रकरणात क्रार दिली आहे. ती घरकाम करून पोट भरते. तिचे माहेर घारेगाव एकतुनी असून घारेगाव एकतुनीत तिच्या आईचे घर आहे. आई कमलबाई आसाराम मिसाळ एकटीच राहते. १२ सप्टेंबरला सायंकाळी पाचला मीना या माहेरी आईला भेटण्यासाठी आल्या. १४ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास आईच्या घरी जेवण केले. त्यानंतर काम आवरून गप्पा मारत असताना रात्री १० वा. मीना यांचा पती जगदीश शिवराम पाटील याने मीना यांना कॉल केला व सांगितले, की मी तुला घ्यायला येत आहे. तू माझ्यासोबत लगेच चालशील. मी आता गावाजवळ आलेलो आहे. तू जर माझ्यासोबत आली नाही तर मी तुला मारून टाकीन, अशा धमक्या त्याने दिल्या.

शिवीगाळ करून म्हणाला, की तू आताच माझ्यासोबत घरी चल. मीना या त्याला समजावून सांगत होत्या की, आता रात्र झाली आहे. आपण सकाळी जाऊ. तरीही तो कॉलवर धमक्या देत होता, की तू जर माझ्यासोबत आता आली नाही तर मी तुझ्या आईचे घर जाळून टाकीन. त्यामुळे मीना व तिची आई घाबरून गेल्या. जगदीशच्या भीतीपोटी रात्री ११ ला दोघी चुलत आजीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या. रात्री साडेअकराला मीना यांच्या आईच्या घराजवळ जगदीश मोठमोठ्याने शिवीगाळ करत असल्याचा आवाज आल्याने मीना या तिकडे गेल्या असता त्याने शिवीगाळ करत मीनाला चापटबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे ती चुलत आजीच्या घराकडे पुन्हा निघून आली.

थोड्यावेळाने शेजारील लोकांची आरडाओरड ऐकू आल्याने मीना, तिची आई कमलबाई, आजीने घराबाहेर येऊन पाहिले असता मीनाच्या आईच्या घराला आग लागल्याचे दिसले. जगदीश बाजूला बसलेला होता. मीनाचे मामा बाबू विनायक वाघमारे, देवीदास वाघमारे व आजूबाजूच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर मीना यांनी घरात जाऊन पाहिले असता आगीत पलंग, गादी, फॅन, साड्या, घरातील संसार उपयोगी साहित्य, रेशन कार्ड, आधार कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे, इतर साहित्य जळालेले होते. त्यानंतर मीना यांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आईसह करमाड पोलीस ठाण्यात येऊन पती जगदीशविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी जगदीशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software